गाझाच्या अल शिफा रुग्णालयात इस्रायली लष्कराचा प्रवेश, मोठी कारवाई सुरू; रुग्णालयात सुरू होतं हमास कमांड सेंटर

इस्रायली सैन्य IDF बुधवारी पहाटे गाझातील सर्वात मोठ्या रुग्णालयात प्रवेश केला. हॉस्पिटलच्या खाली हमासच्या दहशतवाद्यांचे कमांड सेंटर सुरू असल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.

    बुधवारी पहाटे इस्रायली सैन्याने गाझातील सर्वात मोठ्या हॉस्पिटल अल शिफामध्ये (Gaza’s Al Shifa Hospital) प्रवेश केला. इस्रायली लष्कर IDF ने दावा केला आहे की हमास हॉस्पिटल अंतर्गत आपले कमांड सेंटर चालवत (Israel Hamas War) आहे. रुग्णालयात रुग्ण, डॉक्टर व अटेंडंट नसल्याचेही समोर आले आहे. सर्व जखमींना एक दिवसापूर्वीच जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आतमध्ये रुग्ण असल्याने IDF आत जाण्याचे टाळत होते. आता इस्रायली लष्कराने रुग्णालयात दाखल होताच हमासविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून गाझा पट्टीत हमास आणि इस्रायली सैन्य यांच्यातील संघर्षाचे लक्ष सर्वात मोठे रुग्णालय अल शिफावर केंद्रित झाले आहे. मंगळवारी, इस्रायली लष्कराने काही पुरावे दाखवले होते ज्यावरून त्यांचे अल शिफा हॉस्पिटलशी संबंध असल्याचे दिसून आले होते. इस्रायलने दावा केला होता की अल शिफा रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जात असले तरी त्याखाली हमासचे एक मोठे कमांड सेंटर सुरू आहे, जे शहराच्या सर्व बोगद्यांशी जोडलेले आहे. हमासविरुद्धच्या मोठ्या कारवाईत इस्रायल तीन दिवसांपासून या रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता.

    हमासच्या विरोधात केलेल्या जमिनीवरील हल्ल्याचा भाग म्हणून लष्कराने रुग्णालयातील अनेक खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. रुग्णालयांच्या काही खोल्यांमध्ये दहशतवादी लपून बसले असावेत, असा इस्रायली अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्याच्यावर कारवाई सुरू आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की रुग्णालयात कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर चुकीचे उपचार केले जात नाहीत. इस्रायली सैन्य रुग्णालयात दाखल होण्याच्या काही तासांपूर्वी उपचारासाठी आलेल्या जखमी पॅलेस्टिनींना देर अल-बालाह येथील रुग्णालयात हलवण्यात आहे.