Israeli's Netanyahu Cabinet Approves Plan To Capture All Of Gaza
जेरुसेलम: इस्रायलने गाझा पट्टीवर पूर्ण ताबा मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अंतिम आणि निर्णायक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. नेतन्याहूंनी इस्रायली संरक्षण दलाने सादर केलेल्या एका नवीन लष्करी रणनीतीच्या योजनेला मंजूरी दिली आहे. नेतन्याहूंची मंजुरी मिळताच इस्रायली संरक्षण दल गाझावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. हमासविरोधात ही योजना आखण्यात आली आहे.
इस्रायली संरक्षण दलाच्या या नव्या योजनेनुसार, गाझाच्या उत्तर आणि मध्य भागात लष्करी दबाब वाढवणे, तसेच नागरिकांना बाहेर काढणे आणि हजारो राखीव सैनिक तैनात करणे अशा गोष्टींचा समावेश आहे. यावरुन लक्षात येते की, इस्रायलने गाझावर पूर्णपण ताबा मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नेतन्याहूंची ही सर्वात मोठी राजकीय आणि लष्करी खेळी आहे.
शनिवारी (03 मे) इस्रायलने गाझा पट्टीतन हजारो राखीव सैनिक तैनात केले आहेत. हमासवर दबाव वाढवण्यासाठी गाझामध्ये लष्करी कारावाईचा विस्तार इस्रायलने सुरु केला आहे. ही योजना इस्रायलचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल इयाल झमीर यांनी सादर केली होती. या अंतर्गत उत्तर आणि मध्य गाझातून नागरिकांना स्थलांतर करण्यात येईल आणि इस्रायल हमासविरोधात लष्करी कारवाई सुरु करेल.
याच दरम्यान पंतप्रधान नेतन्याहू यांनी कतारविरोधात एक विधान केले आहे. त्यांनी कतारला प्रश्न केला आहे की, त्यांचा पाठिंबा हमासच्या बर्बरला आहे का इस्रायलच्या सभ्यतेला. कतार आपली बाजू कोणा एकाच्या बाजूने स्पष्ट करावी असे नेतन्याहूंनी म्हटले आहे.
दरम्यान कतारचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल-अन्सारी यांनी नेतन्याहूंच्या या विधानाला भडकाऊ म्हटले आहे.
दरम्यान इस्रायली सुरक्षा दलाच्या या नवीन योजनेमुले गाझातील नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच हमासच्या ताब्यात असलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांची देखील चिंता वाढली आहे. अनेक कुटुंबीयांनी नेतन्याहूंच्या या नवीन योजनेला विरोदा केला आहे. आपत्कालीन व्यवस्थेने यामुळे हमासच्या कैद्यात असलेल्या इस्रायली ओलिसांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हमासच्या कैदेत अद्यापही 59 हून अधिक इस्रायली ओलिस आहे. गाझामध्ये आतापर्यंत 50 हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. 2023 ऑक्टोबरमध्ये सुरु झालेले हे युद्ध अद्यापही संपण्याचे कोणतेही चिन्ह नाही. पुन्हा एकदा इस्रायलने गाझामध्ये मोठी लष्करी कारवाई सुरु केली आहे.