तणावपूर्ण परिस्थितीमध्ये पुतिन यांची मोदींना साथ; पहलगाम विरोधात घेतला आक्रमक पवित्रा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताविरोधात कडक कारवाई केली आहे. यामुळे पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. दोन्ही देशांच्या तणावादरम्यान रशियाने भारताला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच रशियाने दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. याच दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी फोनवरुन पंतप्रधान मोदींशी देखील संवाद साधला. त्यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. तसेच मृतांबद्दल शोक व्यक्त केला. पुतिन यांनी दहशतवादविरुद्धच्या लढाईत भारताला आपले पूर्ण समर्थन असल्याचे म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन झालेल्या संवादादरम्यान पुतिन यांनी पहलगामच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. तसेच हल्ल्यातील दोषींना आमि त्यांच्या समर्थकांना शिक्षा झालीच पाहिजे असे म्हटले. यामध्ये रशियाचा पाठिंबा पूर्णत: भारताला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
President Putin @KremlinRussia_E called PM @narendramodi and strongly condemned the terror attack in Pahalgam, India. He conveyed deepest condolences on the loss of innocent lives and expressed full support to India in the fight against terrorism. He emphasised that the…
— Randhir Jaiswal (@MEAIndia) May 5, 2025
दरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करम्यावरही भर दिला. अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना रशियाच्या विजय दिनाच्या 80 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देखील पंतप्रधान मोदींना दिल्या. तसेच या वर्षाच्या अखेरीस भारतात शिखर परिषद होणार आहे. या परिषदेचे निमंत्रणी मोदींनी पुतिन यांना दिले.
रशियाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच भारताला मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे. रशियाच्या या हालचालींमुळे पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. रशियाची मदत भारताला मिळणे पाकिस्तानसाठी मोठे धोकादायक मानले जात आले आहे.
दरम्यान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी पूर्वी संवाग साधला होता. त्यावेळी त्यांनी दोन्ही देशांनी शांततेचा मार्ग अवलंब करावा असे म्हटले होते. दरम्यान त्यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशीही चर्चा केली होती. त्यांनी पाकिस्तानला मॉस्को दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यास मदत करण्यास तयार असल्याचे म्हटले. तथापि, रशियाच्या या ऑफरवर भारत सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी इराणने देखील दोन्ही देशांत मध्यस्थीची ऑफर दिली आहे.