Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Drone Attack : ‘हे खपून घेणार नाही’ , UAE वरील हल्ल्यात भारतीय जखमी झाल्याने सरकार संतप्त, इराणला थेट सुनावलं

India on Iran UAE Attack : इराणच्या यूएईवरील हल्ल्याची भारताने निंदा केली आहे. या कृत्याचा निषेध करत भारतीय नागरिकांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2026 | 01:02 PM
India on Iran UAE Attack

India on Iran UAE Attack

Follow Us
Follow Us:
  • इराणचा युएईवर हल्ला
  • तीन भारतीय जखमी
  • भारताचा इराणला थेट इशारा
India on Iran attack on UAE : पश्चिम आशियातील तणाव कमालीचा वाढला आहे. सोमवारी (०४ मे) इराणने संयुक्त अरब अमिराती(UAE) च्या तेल बंदरावर हल्ला केला आहे. या हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे यूएईच्या फुजैराह पेट्रोलियम इंडस्ट्रीज झोनमध्ये स्फोट झाला असून आग लागली आहे. यामध्ये तीन भारतीय जखमी झाले आहेत. या घटनेवर भारताने तीव्र संताप व्यक्त करत इराणला सुनावलं आहे.

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका! इराणचा UAE च्या तेल बंदरावर हल्ल्याने खळबळ; ३ भारतीय जखमी

भारताची आक्रमक भूमिका

यूएईमधील हल्ल्याचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र निषेध केला आहे.  या संदर्भात एक निवेदन जारी करण्यात आले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे की, निष्पाप नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे कोणत्याही परिस्थिती स्वीकारले जाणार नाही.

Our statement on the attack on Fujairah ⬇️ 🔗 https://t.co/01Nz7g06FR pic.twitter.com/KQAr8R9ciQ — Randhir Jaiswal (@MEAIndia) May 5, 2026

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील यूएईवर इराणने केलेल्या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये इराणच्या कृत्याचा निषेध करत म्हटले की, आम्ही यूएईसोबत खंबीरपणे उभे आहोत. यामध्ये भारतीयांवर झालेला हल्ला दुर्दैवी आहे. पंतप्रधान मोदींनी हा हल्ला प्रादेशिक अस्थिरतेसाठी घातक असल्याचे म्हटले आहे.

Strongly condemn the attacks on the UAE that resulted in injuries to three Indian nationals. Targeting civilians and infrastructure is unacceptable. India stands in firm solidarity with the UAE and reiterates its support for the peaceful resolution of all issues through… — Narendra Modi (@narendramodi) May 5, 2026

स्ट्रेट ऑफ होर्मुझवर मोठा दावा

याच वेळी भारताने होर्मुझवरही मोठे भाष्य केले आहे. भारताने स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Hormuz) च्या नाकेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर होणाऱ्या परिणांमाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जागतिक उर्जा सुरक्षा आणि समुद्री व्यापारासाठी होर्मुझ महत्त्वाचा असून हा मार्ग खुला करण्याची मागणी भारताने केली आहे.

तसेच भारताने संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि राजनैतिक प्रयत्नांचा सल्ला दिला आहे. पश्चिम आशियात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी भारत मध्यस्थी किंवा शांतता प्रक्रियेत सहभागी होण्यास तयार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यूएईवरील इराणच्या हल्ल्यावर भारताने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: भारताने इराणच्या यूएईवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. नागरिक आणि पायाभूत सुविधांवरील हल्ले अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. तसेच तणाव कमी करण्याची मागणी केली आहे.

  • Que: इराणने यूएईमध्ये कुठे आणि कधी केला हल्ला?

    Ans: सोमवारी (०४ मे) इराणने संयुक्त अरब अमिराती(UAE) च्या फुजैराह पेट्रोलियम इंडस्ट्रीज झोनमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली आहेत.

Web Title: It wont be acceptable india condemns attack on uae fujairah oil hub

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • MEA
  • narendra modi
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.