(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराण(Iran)ने सोमवारी (०४ मे) यूएईच्या फुजैराह झोनमधील तेल बंदरावर एकाच वेळी अनेक क्रूझ आणि क्षेपणास्त्रे डागली. याशिवाय ड्रोन हल्लेही करण्यात आले. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने यातील १२ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, ३ क्रूझ क्षेपणास्त्र, ४ ड्रोन यशस्वीरित्या हाणून पाडली आहे. परंतु एक ड्रोन फुजैराच्या पोर्टला धडकला. यामुळे भीषण स्फोट झाला आणि आग लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये तीन भारतीय जखमी झाले आहेत. यूएईतील भारतीय दूतावासाने याची पुष्टी केली आहे. सध्या तीन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालय या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
Three Indian nationals have been injured in today’s attacks in Fujairah. We are in touch with local authorities for ensuring adequate medical care and welfare of the affected Indian nationals.@MEAIndia @cgidubai — India in UAE (@IndembAbuDhabi) May 4, 2026
अमेरिका (America) इराण मध्ये गेल्या काही आठवड्यांपासून तात्पुरता युद्धविराम लागू करण्यात आला होता. परंतु या हल्ल्यामुळे शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. दोन्ही देशांमधील शांतता चर्चाही ठप्प झाली आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा तणावाची चिन्हे दिसू लागली आहे.
इराणच्या या हल्ल्यावर यूएईने तीव्र संताप व्यक्त केला आहे. हल्ल्याचा निषेध करत यूएईने, राष्ट्राची सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहे आणि आम्ही कोणत्याही धोक्याला सामोरे जाण्यास सज्ज आहोत असे म्हटले आहे.
यूएईचे हे बंदर ओमानच्या आखाताजवळ आहे. यामुळे यूएईला इराणच्या नियंत्रणातील स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Homuz) ला वळसा घालून जागतिक बाजारपेठेत तेल निर्यात शक्य होते. हे बंदर यूएईच्या तेल उद्योगासाठी आणि अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा कणा मानले जाते. या बंदरावरील हल्ल्यामुळे यूएईच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहचू शकतो.
इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझची नाकेबंदी केल्यामुळे सध्या जगभरात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थिती फुजैराह सारख्या बंदरावर हल्लाकरण्यात आला आहे. यामुळे परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. या वाढत्या तणावामुळे पुन्हा आखाती देशांमध्ये अस्थिरता निर्माण होऊन जागतिक बाजारात तेलाच्या किमती भडकू शकतात.






