Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा एक सल्ला अन् खलिस्तानी दहशतवादीला झाली अटक; कॅनडामध्ये हालचालींना वेग

India Canda Relations : भारत आणि कॅनडाचे संबंध गेल्या काही काळात सुधारताना दिसत आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठीकनंतर दहशतवादविरोधी मोठी कारवाई करण्याता आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 22, 2025 | 06:42 PM
Canada Arrests Khalistani Terrorist Inderjit Singh Gosal

Canada Arrests Khalistani Terrorist Inderjit Singh Gosal

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्याला अटक
  • भारतासाठी मोठे यश
  • भारत आणि कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीनंतर मोठी कारवाई

Kahlistani Terriost arrested in Canada : ओटावा :  एक मोठी बातमी समोर आली आहे. कॅनडाने खलिस्तानी दहशतवादी इंद्रजित सिंग गोसाळला अटक केली आहे. ही कारवाई भारत आणि कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या झालेल्या बैठकीनतंर करण्यात आली आहे. हे भारतासाठी मोठे यश मानले जात आहे. गोसाळ हा शीख फॉर जस्टिस (SFJ) चे दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू यांचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. मात्र आता त्याला अटक करण्यात आली आहे.

२० सप्टेंबर रोजी कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नॅथली ड्रोउन भारत दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (Ajit Doval) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही मंत्र्यांनी दहशतवादविरोधी एकत्र येण्याचे आणि गुन्हेगारीविरोधात लढण्याचे वचन केले. यानंतरच कॅनडाच्या मार्क कार्नी सरकारवर खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यामुळे भारताला हे यश मिळाले आहे.

‘खलिस्तानींची आता खैर नाही’, ट्रुडोंच्या जाण्यानंतर भारत-कॅनडा संबंधात सुधार; दहशतवादाविरोधी दोन्ही देश एकत्र लढणार

गेल्या वर्षी देखील झाली होती अटक

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर टोरंटो एरिया (GTA)मधील एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला होता. या हिंसाचारात इंद्रजित सिंग गोसाळला पोलिसांनी अटक केली होती. पण नंतर काही अटींवर इंद्रजित सिंगला सोडण्यात आले होते. इंद्रजित सिंग गोसाळला कॅनडातील खलिस्तानी मोर्चांचा प्रमुख मानले जाते. त्याला शस्त्रांस्त्रांच्या संबंधित गुन्ह्यांच्या आरोपाखील देखील अटक करण्यात आली होती.

भारताने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या गुरपतवंत सिंग पन्नूचा बॉडीगार्ड म्हणून तो कार्यरत होता. दरम्यान कॅनडाने त्याला अटक केली आहे. तसेच कॅनडाने यासंदर्भात एक अहवालही सादर केला आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, कॅनडात अनेक खलिस्तानी दहशतवादी भारतविरोधी निधी जमा करत आहे. यामध्ये बब्बर खालसा इंटरनॅशन आणि इंटरनॅशनल एसवायएफ या दहशतवादी गटांचा समावेश आहेत. अहवालानुसार, हे दहशतवादी गट छोट्या छोट्या संघटनांमध्ये विखरुन भारतविरोधी कार्य करत आहेत.

भारतासाठी काय आहे या अटकेचे महत्त्व?

भारत आणि कॅनडातील संबंध माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्यामुळे बिघडले होते. ट्रुडो यांनी २०२३ मध्ये झालेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचा आरोप भारतावर केला होता. तेव्हापासून खलिस्तानी भारतविरोधी आक्रमक झाले होते. मात्र यामुळे भारत आणि कॅनडा संबंध ताणले गेले.

दरम्यान आता कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या सरकारच्या नेतृत्त्वाखाली भारत आणि कॅनडाने दहशतवादाविरोधात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. इंद्रजित सिंगच्या अटकेमुळे दहशतवादाला संपवण्याच्या दिशेने दोन्ही देशांनी सकारात्मक पाऊल टाकले आहे. यामुळे भारतासाठी ही अटक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

कॅनडाने कोणला अटक केली? 

कॅनडाने खलिस्तानी दहशतवादी इंद्रजित सिंग गोसाळला अटक केली असून तो शीख फॉर जस्टिस (SFJ) चे दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूसाठी पर्सनल बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होता.

भारतासाठी ही अटक महत्त्वाची का? 

भारत आणि कॅनडाने दहशतवादविरोधी एकत्र येण्याचे आणि गुन्हागारीला संपवण्याचा निर्धार केला आहे. यामुळे याच्या निर्धाराच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

भारत-कॅनडा संबंधावर खलिस्तानी नाराज? व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी

Web Title: Kahlistani terriost arrested in canada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 06:32 PM

Topics:  

  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

ब्रिटन हादरला! मँचेस्टरमध्ये यहूदी प्रार्थनास्थळाबाहेर लोकांवर हल्ला ; कारने धडक दिल्यानंतर चाकूने वार
1

ब्रिटन हादरला! मँचेस्टरमध्ये यहूदी प्रार्थनास्थळाबाहेर लोकांवर हल्ला ; कारने धडक दिल्यानंतर चाकूने वार

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच
2

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत
3

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका
4

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.