भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी कॅनडाच्या समकक्ष राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नॅथली ड्रोइन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India Canada Relations : ओटावा/नवी दिल्ली : गेल्या काही काळात भारत आणि कॅनडा (Canada) संबंधामध्ये सुधारणा होताना दिसत आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या राजीनाम्यानंतर नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी मैत्राचा हात पुढे केला आहे. यामुळे आता कॅनडातील खलिस्तानींना मोठा धक्का बसला असून त्यांचा अंत जवळ आला म्हणालयाल हरकत नाही. यासाठी दोन्ही देश सक्रियपणे सहकार्य करण्यावर सहमत झाले आहेत.
नुकतेच कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नॅथली ड्रोउन यांनी भारताला भेट दिली होती. यावेळी त्यांनी नवी दिल्लीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (Ajit Doval) यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवादविरोधी सहकार्य, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी लढ आणि गुप्त माहितीची देवाणघेवाणीवर चर्चा झाली. तसेच दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर चर्चा करण्यात आली.
भारत-कॅनडा संबंधावर खलिस्तानी नाराज? व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी
भारत आणि कॅनडाच्या संबंधात सुधारणा नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना G-7 चे आमंत्रण दिल्यानंतर झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी G-7 साठी कॅनडाच्या कॅननिस्किसमध्ये उपस्थित दर्शवली. तेव्हापासून भारत आणि कॅनडा संबंधात हळूहळू सुरधारणा होऊ लागली.
सध्या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाने द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी सहकार्य करण्याचे म्हटले आहे. यात दहशतवादविरोधी उपाययोजना, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीला सामोरे जाणे आणि राजनैतिक संबंधांना चालना देण्यावर चर्चा झाली. तसेच डोवाल यांनी समकक्ष ड्रोइन यांच्याशी दोन्ही देशांचे संबंध सुरक्षा क्षेत्रात पुढे नेण्यावरही भर दिला.
कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिनी ट्रुडो यांनी भारतावर हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप लावाल होता. तसेच याअंतर्गत काही लोकांना अटकही करण्यात आली होती. तेव्हापासूनच भारत आणि कॅनडा संबंधामध्ये दरार पडली.
FAQs(संबंधित प्रश्न)
ट्रुडोंच्या राजीनाम्यानंतर भारत-कॅनडा संबंधाची स्थिती काय आहे?
ट्रुडोंच्या राजीनाम्यानंतर कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या कारकिर्दीत भारत आणि कॅनडा संबंधामध्ये सुधारणा होताना दिसून येत आहे.
अजित डोभाल यांनी कोणाची भेट घेतली?
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी कॅनडाच्या समकक्ष राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नॅथली ड्रोइन यांची भेट घेतली.
अजित डोभाल आणि नॅथली ड्रोइन यांच्यात कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली?
दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये दहशतवादिरोधी एकत्र येण्यावर, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीविरोध सहकार्य करण्यावर चर्चा झाली. तसेच दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध सुधारण्यावरही चर्चा झाली.
कॅनडाकडून G-7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण; खलिस्तानी समर्थकांमध्ये संताप