महागाई (inflation)आणि आर्थिक संकटाशी(Pakistan Financial Crisis) झगडणाऱ्या पाकिस्तानला आता विजेचे संकट (Pakistan Power Cut) आले आहे. सोमवारी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित झाला. इस्लामाबाद, लाहोर आणि कराची या शहरांमध्ये अनेक तासांपासून वीज नाही. ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल ग्रीड सकाळी 7:34 वाजता खाली आला. त्यामुळे वीज यंत्रणा बिघडली. मंत्रालयाने सांगितले की प्रणाली सुधारण्यासाठी वेगाने काम केले जात आहे.
[read_also content=”चालत्या दुचाकीवर रोमान्स करणं जोडप्याला पडलं महागात, पोलिसांनी तरुण-तरुणीला केली अटक https://www.navarashtra.com/latest-news/police-arrested-the-couple-in-chhattisgarh-who-did-romance-on-a-moving-bike-nrps-363764.html”]
पाकीस्तानात सकाळपासून विज गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही वीज यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी 8 ते 10 तास लागतील अशी माहिती उर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी जिओ न्यूजला दिली. त्यांनी सांगितले की, वीज वाचवण्यासाठी पाकिस्तानमध्ये हिवाळ्यात वीज निर्मिती युनिट बंद ठेवली जातात. सकाळी साडेसातच्या सुमारास जेव्हा यंत्रणा चालू केली तेव्हा उत्तर पाकिस्तानच्या क्षेत्राच्या व्होल्टेजमध्ये बरेच चढ-उतार दिसून आले. त्यानंतर एकामागून एक संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. वृत्तानुसार, वीज यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी 8 ते 10 तास लागू शकतात.
जिल्हे जिओ न्यूजनुसार, क्वेटा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीने सांगितले की, बलुचिस्तानमधील 22 शहरे सकाळपासून वीजविना आहेत. येथे गुड्डू आणि क्वेटा दरम्यानच्या दोन सप्लाय लाईनमध्ये समस्या आहे. गेल्या वर्षी १२ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. पाकिस्तानने यावर्षी नवीन ऊर्जा योजना आणली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही पाकिस्तानमध्ये मोठी वीज खंडित झाली होती. त्यानंतर कराची, लाहोरसारख्या शहरांमध्ये सुमारे 12 तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
Pakistan suffers major power outage; parts of Islamabad, Lahore, Karachi without electricity for hours Read @ANI Story | https://t.co/LxEzfM2sie#Pakistan #Pakistanpoweroutage #poweroutage pic.twitter.com/EsiGrqIupF — ANI Digital (@ani_digital) January 23, 2023