Khaleda Zia's BNP makes serious allegations against Mohammad Yunus
ढाका: बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका २०२६ एप्रिलपर्यंत घेण्याचे मोहम्मद युनूस यांनी जाहीर केले आहे. परंतु शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने याला विरोध केला आहे. खालिदा जिया यांच्या बीएनपीच्या पक्षाने देखील विरोध केला आहे. शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी खालिदा जिया यांच्या पक्षाने बीएनपीने एप्रिलपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यास विरोध केला आहे. यामुळे बांगलादेशात राजकीय गोंधळ उडाला आहे.
बीएनपी पक्षाच्या म्हणण्यानुसार, निवडमुका २०२५ पर्यंत घेण्यात आल्या पाहिजे. २०२६ एप्रिलपर्यंत निवडणुका घेण्यामागे मोहम्मद युनूस कोणाचा हित साधून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा प्रश्न अंतरिम सरकारला बीएनपीच्टया स्थायी समितीचे सदस्य अमीर खसरु महमूद चौधरी यांनी विचारला आहे.
रविवारी (८ जून) एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना अमीर खसरु यांनी म्हटले की, “अंतरिम सरकार निवडणुका निष्पक्ष घेणार की नाही यावर शंका उपस्थित झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी ” २०२६ पर्यंत निवडणुक घेण्यामागे युनूस त्यांच्या कोणता हेतू साधण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. अमीर खसरू यांनी खराब हवामान, रमजान आणि विद्यार्थ्यांच्या परिक्षा या गोष्टींचा हवाला दत निवडणुका घेणे अव्यवहार्य असल्याचे म्हटले आहे.
बीएनपीने २०२५ च्या डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे म्हटसले आहे. किवा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये निवडणुका घेण्याची मागणी बीएनपीने केली आहे. खसरु यांच्या मते, एप्रिलमध्ये निवडणुका घेण्याची योग्य वेळ नाही. त्यांनी अंतरिम सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थितक केले आहे. तसेच यातून कोणाचा हेतू सरकार साधत आहे असा प्रश्न विचारला आहे.
शेख हसीना यांच्या अवामी लीगचा विरोध
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान सध्या भारतात आहेत. त्यांच्या अवामी लीग पक्षाने देखील निवडणूकीला विरोध केला आहे. युनूस सरकारने शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी घातली आहे. यामुळ अवामी लीगला निवडणूका लढवता येणार नाही. तसेच या पक्षाच्या अनेक नेत्यांनी देश सोडला आहे.
अवामी लीगने निवडणुकीच्या निर्णयाला विरोध करत म्हटले आहे की, शेख हसीना लोकशाही पद्धतीने निवडून आल्या आहेत. यामुळे २०२९ पर्यंत त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार आहे. लोकशाही शासनव्यवस्था मोडण्याचा अंतरिम सरकार प्रयत्न करत आहे. याशिवाय अवामी लीगने मोहम्मद युनूस यांच्यावर खोटे आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे खालिदा जिया यांच्या बीएनपी पक्षाने डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले आहे. मोहम्मद युवूस यांनी अद्याप पुढील कारवाईचे आदेश दिलेले नाहीत.