युनूसमुळे देशात बेरोजगारी अन्... ; बांगलादेशच्या अवमी लीग पक्षाचे अंतरिम सरकारवर गंभीर आरोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: अखेर बांगलादेशांच्या सार्वत्रिक निवडणुकांची तारिख निश्चित झाली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी २०२६ च्या एप्रिलमध्ये निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने मोहम्मद युनूस यांच्यावर खोटे आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्याचा आरोप केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अवामी लीगच्या मते, लष्कर आणि राजकीय पक्षाच्या दबावानंतर युनूस यांनी सार्वत्रिक निवडुकांची घोषणा केली आहे. मोहम्मद युनूस यांनी आपल्या भाषणात त्यांचे सरकार योग्य आणि निष्पक्ष निवडणुका घेईल असे आश्वासन दिले आहे. त्यांनी म्हटले की, बांगालदेशातील सर्वात मोठ्या संकटाचे मूळ कारण निवडणुका आहेत, यामुळे मोठ्या प्रमाणात देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. याच वेळी अवामी लीगने युनूस आपले अपयश लपवण्यासाठी शेख हसीनांच्या सरकारला दोष देत असल्याचे आरोप केले आहेत. तसेच अवामी लीगने देशात संकटाचे वातावरण निर्माण करण्याचा युनूस प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.
बांगलादेशाच्या अर्थव्यस्थेत निर्माण झालेली अस्थिरतेला मोहम्मद यांच्या नेतृत्त्वाखाली अंतरिम सरकार असल्याचा आरोप अवामी लीग ने केला आहे. तसेच अंतरिम सरकारमुळे उद्द्योग बंद पडल्याचा, परदेशी गुंतवणूक थांबवल्याचा आणि देशात बेरोजगार वाढीचा आरोपही अंतरिम सरकारवर केला आहे. अवामी लीगने अंतरम सरकारवर भष्ट्राचार आणि कर पक्षपाताचा आरोप केला आहे.
अवामी लीगने दावा केला आहे की, मोहम्मद युनूस यांनी ६६६ कोटींची करमाफी वैयक्तिक रित्या दिली आहे. तसेच ग्रामीण बॅंकेलाही करमाफी देण्यात आली आहे. विकासाच्या नावाखाली मोहम्मद युनूस यांचे सरकार देशाची मालमत्ता आणि पायभूत सुविधांचा परदेशी हितसंबंधांसाठी वापर करत असल्याचे अवामी लीग ने म्हटले आहे.
तसेच शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने देशातील नागरिकांना संबोधून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. अवामी लीगने म्हटले आहे की, “आपल्याला देशाचे भविष्य सुधारायचे असले, तर एकजुटीने काम करावे लागले. या देशद्रोही शक्तींशी लढा देण्यासाठी देशभक्तांनी एकत्र येण्याची गरज आहे.”
युनूस सरकार जनतेसाठी नव्हे, तर परदेशी लोकांच्या हितासाठी काम करत असल्याचे अवामी लीग ने म्हटले आहे. अंतरिम सरकरामधील सदस्य भविष्यात देश सोडून जातील, असा दावा अवामी लीगने केला आहे.