गांधी जयंतीपूर्वी मोठी घटना! लंडनमध्ये महात्मा गांधींच्या स्मारकाची विटंबना, वातावरण तापणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Mahatma Gandhi Statue Vandalise in London : लंडन : एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. लंडनच्या टॅविस्टॉक स्क्वेअर येथे महामात्मा गांधीच्या (Mahatma Gandhi) पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे या घडनेवर जगभरातील भारतीयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच वेळी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेला हिंसक कृत्य म्हणून संबोधले आहे.
उच्चायुक्तालयाने या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही केवळ तोडफोड नसून महात्मा गांधीच्या विचारांवर हिंसक हल्ला आहे.हा जागतिक वारशावर एक घंबीर हल्ला आहे. या घटनेवर उच्चायुक्तालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पुतळ्याचे स्वरुप पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीची जयंती आहे. यामुळे या घटनेवर जगभरातील भारतीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
इंडोनेशियात भीषण दुर्घटना! इस्लामिक शाळेची इमारत कोसळली अन् निरागस विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले
महात्मा गांधीच्या पुतळ्यावर काही अज्ञात व्यक्तींनी अपमानास्पद भित्तीचित्रे काढली आहेत. यामुळे स्थानिक भारतीयांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरवर्षी २ ऑक्टोबरला गांधी जयंतील निमित्त लंडनमध्ये महात्मा गांधीच्या या स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली जाते.तसेच गांधीजींचे प्रिय भजन गाऊन त्यांना अभिवादन केले जाते. यामुळे ही घटना पवित्र परंपरेवर आघात असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.
@HCI_London is deeply saddened and strongly condemns the shameful act of vandalism of the statue of Mahatma Gandhi at Tavistock Square in London. This is not just vandalism, but a violent attack on the idea of nonviolence, three days before the international day of nonviolence,… — India in the UK (@HCI_London) September 29, 2025
या स्मारकाचे ऐतिहासिक महत्त्वही खूप मोठे आहे. इंडिया लीगच्या पाठिंब्याने १९६८ मध्ये टॅविस्टॉक स्क्वेअरवर गांधीजींचा कांस्य पुतळा बसवण्यात आला होता. लंडनच्या युनिव्हर्सिटीत गांधीजींन कायद्याचे शिक्षण घेतले होते. यामुळे त्यांच्या स्मरमार्थ हे स्मारक उभारण्यात आले होते. हे स्मारक केवळ भारतीयांसाठी नव्हे तर जागतिक पातळीवरही अहिंसा आणि शांततेचे प्रतीक मानला जातो. सध्या स्थानिक पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे. या घटनेमुळे भारतीयांमध्ये संताप उफाळला आहे. या घटनेतून पुन्हा एकदा गांधीडींच्या अहिंसेच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. महात्मा गांधीच्या पुतळ्याची तोडफोड कुठे करण्यात आली?
ब्रिटनची राजधानी लंडनच्या टॅविस्टॉक स्क्वेअर येथे महामात्मा गांधीच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे.
प्रश्न २. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने या घटनेवर काय प्रतिक्रिया दिली?
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने या कृतीला अहिंसेच्या विचारांवर हिंसक हल्ला म्हटले आहे, तसेच या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
प्रश्न ३. महात्मा गांधीच्या पुतळ्यावर काय लिहिण्यात आले?
महात्मा गांधीच्या पुतळ्यावर काही अज्ञात व्यक्तींनी अपमानास्पद भित्तीचित्रे काढली आहेत.