नेदरलँड्स हादरलं! ॲमस्टरडॅममधील ज्यू शाळेत भीषण स्फोट; महापौरांनी केला संताप व्यक्त (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
शनिवारी (१४ मार्च २०२६) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी शाळेत कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक नव्हते. यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण ॲमस्टरडॅमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच स्थानिक लोकांना पोलिसांनी तातडीने कळवले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
सध्या हा स्फोट का करण्यात आला? यामागाचा हेतू काय होता? कोणी केला ? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सीसीटीव्ह फुटेजमध्ये संशयति व्यक्ती स्फोट घडवताना कैद झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या स्फोटाच्या एक दिवस आधीच शुक्रवारी (१३ मार्च २०२६) रात्री रॉटरडॅम येथील एक ज्यू प्रार्थनास्थळावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या सोमवारी देखील नेदरलँड्सचा शेजारी देश बेल्जियमध्ये अशाच प्रकारचा स्फोट घडला होता. एकामागून एक होणाऱ्या या हल्ल्यांमध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक मूव्हमेंट ऑफ द कम्पॅनियन्स ऑफ द राइट गटाने घेतली असल्याचे म्हटले जात आहे. डच पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
ॲमस्टरडॅमच्या महापौरांनी केला संताप व्यक्त
या हल्ल्याचा ॲमस्टरडॅमचे महापौर फेमके हलसेमा यांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे कूी, ज्यू समुदायाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. हा एक भ्याड हल्ला असून ज्यू नागरिकांवर होणारे वार सहन केले जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. सध्या या स्फोटानंतर नेदरलँडमध्ये ज्यू शाळा आणि प्रार्थनास्थळांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Ans: शनिवारी (१४ मार्च २०२६) पहाटेच्या सुमारास नेदरलँडची (Netherland) राजधानी ॲमस्टरडॅममधील ज्यू शाळेत भीषण स्फोट घडला आहे.
Ans: स्फोट पहाटे ४ च्या सुमारास घडल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
Ans: ॲमस्टरडॅमच्या महापौरांनी ज्यू शाळेतील स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे. ज्यू लोकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ज्यू नागरिकांवरील हल्ले सहन केले जाणार नाही असाही इशारा महापौरांनी दिला आहे.






