Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fazlur Rehman: ‘भारतासोबतचे संबंध बिघडले, जर उद्या मला ठार मारले तर…’, छाती बडवत ‘या’ पाकिस्तानी नेत्याने थेट आसिम मुनीरना घेरले

Pakistan Politics : पाकिस्तानचे राजकारण पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. कराचीमधील एका भाषणात, मौलाना फजलुर रहमान यांनी सध्याच्या राजवटीचे वर्णन नागरी-लष्करी संकरित राजवट असे केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 22, 2026 | 01:31 PM
maulana fazlur rehman challenges asim munir pakistan political crisis india relations

maulana fazlur rehman challenges asim munir pakistan political crisis india relations

Follow Us
Follow Us:
  • थेट लष्करप्रमुखांना आव्हान
  • परराष्ट्र धोरणावर सडकून टीका
  • देशव्यापी आंदोलनाची हाक

Maulana Fazlur Rehman Karachi Speech 2026 : शेजारील देश पाकिस्तान (Pakistan News) सध्या एकाच वेळी आर्थिक दिवाळखोरी आणि राजकीय अराजकतेच्या गर्तेत सापडला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान  यांच्यानंतर आता आणखी एका बड्या नेत्याने थेट पाकिस्तानी लष्कर आणि तिथली गुप्तहेर संघटना ‘ISI’ विरोधात बंड पुकारले आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम-फझलचे (JUI-F) सर्वेसर्वा मौलाना फजलुर रहमान यांनी कराचीमधील एका प्रचंड जनसभेला संबोधित करताना थेट पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या सत्तेला हादरा दिला आहे. “जर उद्या मला ठार मारले गेले, तर त्याला सध्याचे प्रशासन आणि लष्करी यंत्रणाच जबाबदार असेल,” असा उघड इशारा देत मौलानांनी छाती बडवून थेट व्यवस्थेला ललकारले आहे. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

“भारतासोबत संबंध बिघडवले अन् चीनचाही विश्वास गमावला!”

कराचीच्या सभेत बोलताना मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, सध्याच्या कठपुतळी सरकारच्या आणि लष्कराच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे आज पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडला आहे. भारतासोबतचे संबंध सुधारण्याऐवजी ते पूर्णपणे बिघडवून ठेवले आहेत. इतकेच नाही तर शेजारील इस्लामिक देश अफगाणिस्तानसोबत सीमेवर सतत लष्करी तणाव निर्माण केला जात आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तानचा ‘सदाबहार मित्र’ समजल्या जाणाऱ्या चीनचाही आता पाकिस्तानच्या सुरक्षेवरून आणि धोरणांवरून विश्वास पूर्णपणे उडाला आहे. पाकिस्तान अशा चक्रव्यूहात अडकला आहे जिथून बाहेर पडणे कठीण आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: खामेनी म्हटले देशाच्या बाहेर जाणार नाही युरेनियम, ट्रम्प लालबुंद; 60% संवर्धित Uraniumचे रहस्य आणखी गहिरे

Chief of Pakistan’s Jamiat Ulema-e-Islam party, Maulana Fazlur Rehman, said during a press conference in Karachi that Pakistan has long pursued an interventionist policy toward Afghanistan, and that this diplomacy and approach have now failed. He stated that Pakistan has at… pic.twitter.com/0wtlROGUpi — TOLOnews English (@TOLONewsEnglish) May 19, 2026

credit – social media and Twitter

नागरी-लष्करी संकरित राजवट: देश ओलीस धरला!

पाकिस्तानच्या सध्याच्या प्रशासनाला “नागरी-लष्करी संकरित राजवट” (Civil-Military Hybrid Regime) असे संबोधत मौलानांनी गंभीर आरोप केला की, देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. जनतेने निवडून दिलेले सरकार नसून, पडद्यामागून लष्करच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना नाचवत आहे. देशातील जनता महागाईने होरपळत आहे आणि संपूर्ण देश काही मोजक्या लष्करी अधिकाऱ्यांनी ओलीस धरला आहे. आपल्याला सतत अज्ञात नंबरवरून धमकीचे फोन आणि पत्रे येत असल्याचा दावा करत त्यांनी थेट शाहबाज शरीफ सरकार आणि लष्कराला आपल्या सुरक्षेसाठी जबाबदार धरले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mount Everest Record: चीनच्या ‘एका’ चुकीमुळे एव्हरेस्टवर गर्दीचा पूर! 274 जणांनी एकाच वेळी रोवला झेंडा; मोडला अनेक वर्षांपूर्वीचा

मौलाना दुसरे इम्रान खान बनणार का?

पाकिस्तानच्या इतिहासात ज्याने ज्याने लष्कराच्या विरोधात ब्र काढला, त्याला एकतर तुरुंगात डांबले गेले किंवा त्याचा काटा काढला गेला. इम्रान खान यांच्यानंतर आता मौलाना फजलुर रहमान यांनीही हीच वाट धरल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षांचा हाच आरोप आहे की पाकिस्तानमध्ये लोकशाही केवळ नावापुरती उरली आहे. मौलाना यांनी आता २२ मे पासून संपूर्ण पाकिस्तानात या जुलमी व्यवस्थेविरोधात देशव्यापी आंदोलनाची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे येणारे दिवस पाकिस्तानसाठी अत्यंत हिंसक आणि अस्थिर राहण्याची शक्यता आहे.

इस्रायल आणि गाझा युद्धावरून मुस्लीम देशांना एकत्र येण्याचे आवाहन

आपल्या भाषणात केवळ देशांतर्गत मुद्द्यांवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय राजकारणावरही मौलानांनी प्रकाश टाकला. गाझा युद्धाचा संदर्भ देत त्यांनी जागतिक स्तरावर इस्रायलचा प्रभाव वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सर्व अरब आणि इस्लामिक देशांनी एकत्र येऊन इस्रायलच्या विरोधात एक मजबूत इस्लामिक गट स्थापन करावा, अशी मागणी त्यांनी केली. जर आज मुस्लीम देश एकत्र आले नाहीत, तर भविष्यात पाकिस्तानच्या अस्तित्वालाही इस्रायल आणि त्याच्या मित्रराष्ट्रांकडून मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. मौलानांच्या या विधानामुळे पाकिस्तानातील धार्मिक आणि कट्टरतावादी गट अधिक आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मौलाना फजलुर रहमान यांनी कोणाला थेट आव्हान दिले आहे?

    Ans: मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि सध्याच्या संकरित राजवटीला थेट आव्हान दिले आहे.

  • Que: मौलानांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावर काय टीका केली?

    Ans: सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताशी संबंध बिघडले, अफगाणिस्तानशी तणाव वाढला आणि चीननेही विश्वास गमावला, असा आरोप त्यांनी केला.

  • Que: पाकिस्तानात देशव्यापी आंदोलन कधी सुरू होत आहे?

    Ans: मौलाना फजलुर रहमान यांनी वाढती महागाई आणि लष्कराच्या हुकूमशाहीविरोधात २२ मे पासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

Web Title: Maulana fazlur rehman challenges asim munir pakistan political crisis india relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • terrorist

संबंधित बातम्या

Jammu Kashmir : दहशतवादाविरोधात धडक कारवाई, कुपवाड्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
1

Jammu Kashmir : दहशतवादाविरोधात धडक कारवाई, कुपवाड्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?
2

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
3

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

PTI Protest : पाकिस्तानमध्ये राजकीय गदारोळ; इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआयचा इस्लामाबादच्या दिशेने एल्गार
4

PTI Protest : पाकिस्तानमध्ये राजकीय गदारोळ; इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआयचा इस्लामाबादच्या दिशेने एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.