Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : इराणने ओलांडली मर्यादा! तेल आणि गॅस साठ्यांवरील हल्ल्यानंतर आखाती देश संतप्त; दिला ‘हा’ गंभीर इशारा

Iran-Saudi-UAE Tension : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाने प्रचंड अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने आखाती देशांमध्ये तेल आणि गॅस केंद्रावर हल्ले केले आहेत. यामुळे युएई आणि सौदी संतप्त झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 19, 2026 | 01:15 PM
Saudi Warns Iran

Saudi Warns Iran

Follow Us
Follow Us:
  • आता युद्ध अटळ?
  •  इराणच्या गॅस प्लांट आणि तेल केंद्रावरील हल्ल्याने सौदी-युएई संतप्त
  • इराणला थेट लष्करी कारवाईचा इशारा
Saudi Warns Iran : रियाध/तेहरान : मध्यपूर्वेतील संघर्ष आता भीषण झाला आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे इराण (Iran) चवताळला असून मध्यपूर्वेतील आखाती देशांवर हल्ले करत आहे. इराणने सौदी अरेबिया(Saudi Arabia), युएई, कतार, बहरीन या देशांतील उर्जा केंद्र आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केले आहे. यामुळे आखाती देश संतप्त झाले असून इराणला गंभीर इशारा दिला आहे.

Middle East War : इराणचा भयानक सूड! लारीजानींच्या हत्येनंतर जगातील सर्वात मोठा गॅस प्लंट पेटवला, UAE संतप्त

इराणने केलेल्या हल्ल्यानंतर सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांनी कडक शब्दात इशारा दिला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शेजारी देशांवरील हल्ल्याचे परिणाम इराणला भोगावे लागतील. त्यांचे हे विधान इराणच्या हल्ल्यानंतर
सौदीच्या रियाध येथे झालेल्या अरब आणि इस्लामिक देशांच्या बैठकीनंतर आले आहे.

फैसल बिन फरहान यांनी स्पष्ट केले आहे की, इराणने खाडी देश प्रत्युत्तर देणार नाहीत या संमभ्रमात राहू नये. तसेच इराणने आपली धोरणे आणि वर्तन पुन्हा विचारात घेण्याचा सल्ला फरहान यांनी दिला आहे. त्यांच्या मते, इराणच्या
आक्रमक राजकीय, आर्थिक, आणि नैतिक स्तरावर गंभीर परिणाम होत आहे.

अरब-मुस्लिम देशांची बैठक

इराणच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदीची राजधानी रियाध येथे अरब आणि मुस्लिम देशांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कतारच्या Ras Laffan Industrial शहरावरही हल्ला झाल्याचे समोर आले आहे. ही जगातील सर्वात मोठी नैसर्गिक वायू केंद्रापैकी एक मानली जाते. तसेच युएई(UAE) च्या हबशान या गॅस प्रकल्पावरही हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यांमुळे अरब-मुस्लिम देशांच्या उर्जा क्षेत्रालाचा नव्हे, तर संपूर्ण जागाच्या उर्जा क्षेत्राला
मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर सौदीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणवर गंभीर आरोपही केले आहे. इराण गेल्या अनेक दशकांपासून मिलिशाया, हिजबुल्लाह, हमास या कट्टरपंथी गटांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळेच अरब देशांचा
त्यांच्यावरील विश्वास ढासळला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इराणच्या या कारवायांना आता सहन केले जाणार नाही, इराणने सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

जागतिक परिणाम

मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक उर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे.  या संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेड क्रूड १०८ अब्ज डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. यामुळे भारतासह जगभरात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडर महागण्याची शक्यता आहे. ज्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होईल.

Middle East War : ‘रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार’ ; मोजतबा खामेनेईंचा इस्रायल-अमेरिकेला थरकाप उडवणारा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबियाने इराणला काय इशारा दिला?

    Ans: इराणच्या अरब देशांमध्ये उर्जा साठ्यांवरली हल्ल्यानंतर सौदी संतप्त झाला असून इराणला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे.

  • Que: इराणने कतारमधील कोणत्या उर्जा केंद्रावर हल्ला केला आहे?

    Ans: इराणने कतारमधील रास लफान इंडस्ट्रियल सिटी या जगातील सर्वात मोठ्या LNG (लिक्विफाइड नॅचरल गॅस) उत्पादन केंद्रावर हल्ला केला आहे.

  • Que: इराणने युएईच्या कोणत्या उर्जा केंद्रावर हल्ला केला आहे?

    Ans: इराणने युएईच्या हबशान या जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू केंद्रावर हल्ला केला आहे.

  • Que: मध्युपूर्वेतील तणावाचा परिणाम काय होईल?

    Ans: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे अरब देश इराणविरोधात लष्करी किंवा राजकीय कारवाई करु शकता. यामुळे मध्यपूर्वेत युद्ध अधिक भडकण्याची शक्यता आहे.

Web Title: Middle east conflict iran attack gas plant saudi uae warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Iran News
  • Saudi Arabia
  • UAE
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
1

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

US-Iran: जागतिक महासत्तांमध्ये सत्तानाट्य! इराण-अमेरिकेत सत्ता केंद्रस्थानी नवे चेहरे; मोहसेन रझाई अन् विल शार्फ महत्वाच्या पदांवर
2

US-Iran: जागतिक महासत्तांमध्ये सत्तानाट्य! इराण-अमेरिकेत सत्ता केंद्रस्थानी नवे चेहरे; मोहसेन रझाई अन् विल शार्फ महत्वाच्या पदांवर

Mecca Pact: इस्लामिक नाटोची अग्निपरीक्षा! करारांनंतर 24 तासांच्या आत सौदी अरेबियात भीषण स्फोट; तेल शुद्धीकरण कारखाना उद्ध्वस्त
3

Mecca Pact: इस्लामिक नाटोची अग्निपरीक्षा! करारांनंतर 24 तासांच्या आत सौदी अरेबियात भीषण स्फोट; तेल शुद्धीकरण कारखाना उद्ध्वस्त

Iran News : AI ऑलिम्पियाडमध्ये इराणची कमाल; 1 गोल्डसह 4 पदकांची कमाई!
4

Iran News : AI ऑलिम्पियाडमध्ये इराणची कमाल; 1 गोल्डसह 4 पदकांची कमाई!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.