Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग! अमेरिकी हल्ल्यानंतर इराणचा जोरदार पलटवार; आखाती देशांना लक्ष्य

Middle East Conflict Update : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे संकट गडद झाले आहे. अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मध्यपूर्वेतील आखाती देशांना लक्ष्य करण्यात आले असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2026 | 10:04 AM
Iran Attack Gluf Countries

Iran Attack Gluf Countries

Follow Us
Follow Us:
  • इराणचे विनाशकारी प्रत्युत्तर
  • कतार, UAE आणि बहरीनवर क्षेपणास्त्रांचा मारा
  • मध्यपूर्व पुन्हा पेटलं
Middle East Conflict News in Marathi : मध्यपूर्वेत पुन्हा युद्ध पेटलं असून अमेरिकी हल्ल्यानंतर इराणने जोरदार पलटवार केला आहे. रविवारी (१२ जुलै) इराणने आखाती देशांना लक्ष्य करत भीषण ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यात कतार, संयुक्त अरब अमिराती (UAE), बहरीन, आणि जॉर्डनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण आखाती भागात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक देशांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहेत.

Iran-US War : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा तणाव; अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्याने हादरले इराण, होर्मुझमधील जहाजावर…

कतार आणि बहरीनमध्ये सायरन वाजले

रविवारी (१२ जुलै) सकाळी कतारची राजधानी दोहा येथे मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येऊ लागले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कतारच्या गृहमंत्रालयाने तातडीने पावले उचलत देशभरातील नागरिकांना मोबाईलवरुन आपत्कालीन संदेश पाठवण्यात आला.

नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले. दुसरीकडे बहरीनमध्येही एअर रेड सायर वाजवण्यात आले असून सरकारने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश दिले आहेत.

⚡️BREAKING: Iran has just launched a Massive Ballistic Missile strikes on US Bases in Jordan, UAE and Qatar Impacts are reported in several Countries pic.twitter.com/5BfgA08ezX — Iran Observer (@IranObserver0) July 12, 2026

यूएईची हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय

संयुक्त अरब अमिरातीमध्येही इराणकडून अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागण्यात आले होते. परंतु यूएईच्या हवाई संरक्षण यंत्रणनेने सर्व हल्ले हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशातील हवाई संरक्षण सक्रिय करण्यात आल्या असून धोका टाळण्यात यश आले आहे.

अमेरिकेच्या कारवाईनंतर जोरदार पलटवार

अलीकडेच अमेरिकेने इराणमधील लष्करी ठिकाणांवर केलेल्या कारवाईनंतर पलटवार करण्यात आला आहे. इराणने यापूर्वीच अमेरिकेच्या कारवाईला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. होर्मुझमधील वाढत्या तणावामुळे ही परिस्थिती बिकट बनली आहे.

होर्मुझमधील हल्ल्यामुळे बिघडली परिस्थिती

होर्मुझ सामुद्रधुनी जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या भागात काही दिवसांपूर्वी सलग तीन जहाजांवर हल्ले करण्यात आले होते. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) केलेल्या या कारवाईनंतर अमेरिकेने इराणच्या अब्बास बंदर आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांना लक्ष्य केले.

अमेरिकेने हल्ले अशा वेळी केले होते, जेव्हा इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामानेई यांची अंत्ययात्रा आणि दफनविधीला सुरुवात झाली होती. हा भव्यसोहळा सुरु होण्यापूर्वी इराणने अमेरिकेना हल्ला न करण्याचा इशारा दिला होता. परंतु अमेरिकेने हल्ला केला आणि परिस्थिती आणखी चिघळली.

सध्या अमेरिका, इराण आणि इतर प्रादेशिक देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक प्रयत्न सुरु आहे. परंतु मध्यपूर्वेतील युद्ध दिवसेंदिवस पेटतच चालले आहे.

Iran’s Army does Drone Attacks on U.S. Bases in the Region Public Relations of the Army:
In response to the continued aggression by the criminal United States against areas in southern Iran, the Army of the Islamic Republic of Iran, for the past few hours, has targeted with its… https://t.co/7bXejfXwao pic.twitter.com/KWjNSzt1Jb
— Ryan Rozbiani (@RyanRozbiani) July 12, 2026


US Attacks Iran : इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरुच! बुशहेरसह अनेक शहरांमध्ये स्फोट; ट्रम्प-नेतन्याहू चर्चेमुळे वाढली युद्धाची भीती

Web Title: Middle east conflict iran retaliation after us strikes targets gulf countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • UAE
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
1

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
2

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Nigeria Boat Accident: नायजेरियाच्या सोकोटो राज्यात भीषण बोट अपघात; 47 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये महिला अन् बालक
3

Nigeria Boat Accident: नायजेरियाच्या सोकोटो राज्यात भीषण बोट अपघात; 47 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये महिला अन् बालक

Somalia Ship Hijack: 6 भारतीयांसह 10 खलाशी ओलीस; सोमाली चाच्यांनी पळवले शस्त्रास्त्रांनी भरलेले तुर्की जहाज
4

Somalia Ship Hijack: 6 भारतीयांसह 10 खलाशी ओलीस; सोमाली चाच्यांनी पळवले शस्त्रास्त्रांनी भरलेले तुर्की जहाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.