US Attacks Iran : इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरुच! बुशहेरसह अनेक शहरांमध्ये स्फोट; ट्रम्प-नेतन्याहू चर्चेमुळे वाढली युद्धाची भीती (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
China Landslide : चीनमध्ये मोठी दुर्घटना! गान्सू प्रांतात भूस्खलन; २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू
इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या अनेक शहरांमध्ये भीषण स्फोट झाले आहेत. बुशेहर आणि चोगादक येथे सलग सहा स्फोट झाले आहेत. तसेच कोनोरक येथे तीन मोठ्या स्फोटांनी कहर केला आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बुशेहरच्या बाहेरील एका लष्करी तळावर अमेरिका आणि इस्रायलमे क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. परंतु अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणताही नवा हल्ला केला केला नसल्याचे म्हटले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीत तीन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला. अमेरिकेने इराणकडून होर्मुझमधील जहाजांवर हल्ले झाल्याचा आरोप करत भीषण हवाई कारवाई सुरु केली. गेल्या तीन दिवसांत इराणमधील विविध लष्करी तळांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. वृत्तांनुसार, या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू, तर ७८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच मशहद शहराचा रेल्वे संपर्कही तुटला असल्याचे वृत्त आहे.
या भीषण तणावादरम्यान ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यात फोनवर चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आखाती देशांमधील सुरक्षा, लष्करी समन्वय आणि पुढील रणनीतीवर चर्चा केल्याचे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. तसेच इस्रायलच्या सीमेजवळ सुरक्षा क्षेत्र उभारण्याचा मुद्दाही चर्चेत मांडण्यात आला. सध्या या फोनकॉल नंतर मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी इराणसोबतचा सामांजस्य करार(MoU) संपुष्टात आल्याचे सांगत गरज पडल्यास कठोर कारवाईचाही इशारा दिला आहे. इराणमध्येही अंतर्गत परिस्थिती तणावपूर्ण आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा मोठा संघर्ष सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






