Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : मध्यपूर्व धुमसणार? US Iran युद्धात आता ‘या’ बड्या देशाची एन्ट्री, जगभरात खळबळ

US Iran War : ट्रम्प यांच्या लष्करी मदतीच्या आवाहनाला नाटो देश आणि दक्षिण आशियातील मित्र राष्ट्रांनी नकार दिला आहे. पण याच वेळी एक मोठी देश अमेरिकेच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. पण यासाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 18, 2026 | 11:02 AM
france will help america in iran war

france will help america in iran war

Follow Us
Follow Us:
  • तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडणार?
  • अमेरिका-इराण युद्धात फ्रान्सची एन्ट्री
  • फ्रान्सने अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
Middle East War News in Marathi : मध्यपूर्वेतील युद्धाने आता भंयकर वळण घेतले आहे. इराण (Iran) आणि अमेरिका(America)-इस्रायलमध्ये सतत हल्ले सुरु असून प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. इराणकडून मध्यपूर्वेतील अमेरिकन दूतावासा आणि इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे मोठी खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिका स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून इराणला हटलण्यासाठी लष्करी तयारी करत असून फ्रान्सने यासाठी मदतीचे संकेत दिले आहेत. परंतु फ्रान्स युद्धात थेट उतरणार नसल्याचे सांगितले जात आहे.

US Iran War : ‘अमेरिकेच्या ग्रीन झोन’मध्ये घुसला इराण; बगदादमधील दूतावासावर भीषण ड्रोन हल्ल्याने रडार सिस्टमही निकामी, VIDEO

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी अमेरिकेला मदतीची तयारी दर्शवली आहे. परंतु यासाठी एक महत्त्वूर्ण अट ठेवण्यात आली आहे. मॅक्रॉन यांनी म्हटले आहे की, फ्रान्स या युद्धाचा भाग नाही. तसेच केवळ होर्मुझ मुक्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईत सहभागी होणार नाही. फ्रान्सचा भर इराणसोबत शांतता चर्चेवर असून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ही मदत केवळ सागरी सुरक्षेसाओठी मर्यादित राहील असे मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांचे मित्र राष्ट्रांनाही आवाहन

ट्रम्प यांनी होर्मुझच्या आखातात अमेरिकन जहाजांच्या सुरक्षेसाठी नाटो देश व काही मित्र राष्ट्रांकडे मदतीचे आवाहन केले होते. परंतु नाटो देशांनी आणि दक्षिण आशियातील ऑस्ट्रेलिया, जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या मित्र राष्ट्रांनी ट्रम्प यांचा लष्करी मोहिमेत सहभागी होण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. परंतु फ्रान्सने याला प्रतिसाद दिला आहे. यावर ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांनी ट्रुथवर पोस्ट करत नाटोला एकतर्फी संस्था संबोधले. त्यांनी नाटोवर गंभीर आरोप केला की, अमेरिकेने त्यांच्या सुरक्षेसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले, पण जेव्हा अमेरिकेला त्यांची गरज पडली तेव्हा त्यांनी मदत करण्यास नकार दिला. यामुळे  अमेरिकेला आता कोणत्याच देशाची गरज नसल्याचा म्हणतं त्यांनी इराणला गुडघ्यावर आणल्याचा दावाही केला.

ट्रम्प यांनी असाही दावा केला की, इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांच्याकडे आता अमेरिकेला किंवा मध्यपूर्वेतील कोणत्याही देशांना धमकी देण्याएवढी ताकद उरलेली नाही. इराण आता गुडघ्यावर आला आहे असे सांगत त्यांनी अमेरिकेच्या पराक्रमाचा पाढा वाचला.

इस्रायलच्या दबावामुळे अमेरिका युद्धात उतरली

याच वेळी अमेरिकेचे काऊंटर टेररिझम चीफ जो कँट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अमेरिका इस्रायल(Israel)साठी इराणविरोधी युद्धात उतरली असल्याचे म्हटले आहे. यामुळे अमेरिका फर्स्ट धोरणालाही धक्का बसला असल्याचा दावा कॅंट यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

Middle East War: ‘कोणाचीच गरज नाही…’, मित्रराष्ट्रांनी नकार दिल्याने बिथरले ट्रम्प; आक्रमक पवित्रा घेत इराणला नमतं केल्याचा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्ट्रेट ऑफ होर्मुझ महत्त्वाचा का आहे?

    Ans: होर्मुझची खाडी जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूकीच्या मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरुन जगातील एकूण 20 ते 30 टक्के तेल वाहतूक केली जाते. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक बाजारपेठेत मोठा तेल पुरवठा आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

  • Que: होर्मुझचा मार्ग मोकळा करण्यात अमेरिकेला कोणता देश मदत करणार आहे?

    Ans: होर्मुझचा मार्ग मोकळा करण्यासाठी नाटो देशांनी आणि काही मित्र राष्ट्रांनी लष्करी मदतीसाठी नकार दिला आहे. परंतु फ्रान्सने मदतीस हात पुढे केला आहे.

  • Que: फ्रान्स अमेरिकेला कशी मदत करणार आहे?

    Ans: राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले आहे की, फ्रान्स युद्धात थेट सहभागी होणार नाही, तर इराणशी शांतता चर्चेवर भर देईल.

Web Title: Middle east conflict strait of hormuz crisis us iran war trump france macron nato

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Donald Trump
  • France
  • French President Emmanuel Macron
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
2

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
3

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.