UAE Eid : युएईमध्ये इराणी ड्रोन हल्ल्यांचे सावट! दुबईसह संपूर्ण अमिरातीत फक्त मशिदींमध्येच होणार नमाज (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Middle East Conflict : मध्यपूर्व धुमसणार? US Iran युद्धात आता ‘या’ बड्या देशाची एन्ट्री, जगभरात खळबळ
जनरल अथॉरिटी फॉर इस्लामिक अफेअर्स, एंडोमेंट्स अँड जकात’ने बुधवारी (18 मार्च 2026) मोठी घोषणा केली आहे. सोशल मीडियावर केलेल्या अधिकृत पोस्टमध्ये यूएईने म्हटले आहे की, इराणी हल्ल्यांमुळे सुरक्षेसाठी कठरो पावले उचलण्यात येत आहे. युएईच्या सुरक्षा मंत्रालयाने जाहीर केले आहे की, इराणकडजून संभाव्य ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची शक्यता आहे. यामुळे हल्ल्यांचा धोका लक्षात घेता खबरादीर म्हणून दुबई, शारजाह आणि अबू धाबीसह संपूर्ण अमिरातीमध्ये सार्वजनिक रस्ते, खुली मैदाने मोठ्या ईदगाहांवर नमाज पठण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना मशिगींमध्ये लवकर पोहोचण्याचे आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपमे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मिशिदींबाहेर गर्दी न करण्याचेही आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मोठा दंडही आकारला जाऊ शकतो असे युएई सरकाने स्पष्ट केले आहे.
युएईमध्ये चंद्र दर्शन आज (18 मार्च 2026 ) होणार आहे. चंद्र दिसल्यास अमिरातीमध्ये 19 मार्च 2026 रोजी ईद साजरी केली जाईल. असे न झाल्यास रमजान पूर्ण झाल्यावर 20 मार्च रोजी ईद साजरी केली जाणार आहे.
الهيئة العامة للشؤون الإسلامية والأوقاف والزكاة تعلن عن إقامة صلاة عيد الفطر المبارك داخل المساجد على مستوى الدولة pic.twitter.com/8eyBRsGH9J — UAEGOV (@UAEmediaoffice) March 17, 2026
मध्यपूर्वेतील इराण (Iran) संघर्षामुळे प्रादेशिक अस्थिरता पसरली आहे. इराणने आखाती देशांमध्ये विमानतळे, आर्थिक ठिकामे, तेल कारखान्यांवर हल्ले केले आहेत. ज्यामुळे आखाती देश संतप्त झाले आहे. तसेच दुसरीकडे इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने अनेक तेल आणि वायू जहाजे अडकून पडली आहेत. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहे. आखाती देशांवरील हल्ल्याचा जागतिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसण्याची शक्यता आहे.
Ans: सध्या मध्यपूर्वेत अमेरिका-इराण युद्धा तीव्र पेट घेतला आहे. इराण आखाती देशांवर ड्रोन हल्ले करत आहे. यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तवर युएईमध्ये ईदची नमाज फक्त मशिदींमध्येच होणार आहे.
Ans: अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने आक्रमक होत मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांवर हल्ला केला आहे. यामुळे प्रचंड प्रादेशिक अस्थिरता निर्माण दाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.






