Israel Iran War : 'हल्ले सुरुच राहतील...' , ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंचा आक्रमक सूर, युद्ध थांबणार की भडकणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump चा यु-टर्न! IRGC ला फसवले, खाडीत सेटिंग, F-35, B2 बॉम्बर्समध्ये व्यवस्था
ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्यानंतर नेतन्याहूंनी आक्रमक पवित्रा घेत एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी म्हटले की, “मी माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिका-इस्रायलला युद्धात यश मिळाले असून याचे शांतता करारात रुपांतर एक चांगली संधी आहे. यामुळे इस्रायलच्या हिताचे रक्षण होईल असे ट्रम्प यांचे मत आहे. परंतु नेतन्याहूंनी इराणवरील हल्ले सुरुच राहतील असेही संकेत दिले आहे. इराणच्या धोक्याचा उल्लेख करत त्यांनी, इस्रायल इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि अण्वस्त्र कार्यक्रम मोडीत काढण्यासाठी वचनबद्ध असल्याचे म्हटले. ”
दुसरीकडे ट्रम्प यांनी एका अज्ञात इराणी अधिकाऱ्याशी चर्चा केल्याचा दावा केला आहे, जो खोटा असल्याचे इराणने म्हटले आहे. याच वेळी त्यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरु करण्यास सांगितले आहे. असे न केल्यास त्यांच्यावर हल्ले सुरुच राहतील असेही म्हटले आहे.
याच वेळी इस्रायली माध्यमांनी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई शांतता चर्चेसाठी तयार असल्याचा दावा केला आहे. परंतु अद्याप इराणकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय याच वेळी अमेरिकेच्या काही लष्करी हालचालींमुळे हा युद्धबंदीची केवळ एक घोषणा असून यामागेच ट्रम्प यांचा हेतू काही औरच असल्याचा दिसत आहे. यामुळे युद्ध थांबणार का भडकणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
מוקדם יותר היום שוחחתי עם ידידנו הנשיא טראמפ. הנשיא טראמפ מאמין שיש סיכוי למנף את ההישגים הכבירים שהשגנו עם צבא ארה”ב, כדי לממש את יעדי המלחמה בהסכם – הסכם שישמור על האינטרסים החיוניים שלנו. במקביל, אנחנו ממשיכים לתקוף גם באיראן וגם בלבנון. אנחנו כותשים את תוכנית הטילים… pic.twitter.com/EHG9geofkl — Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) March 23, 2026
Ans: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी इस्रायल आपल्या हिताचे रक्षण करत असून इराण-लेबनॉनवरील हल्ले सुरुच राहतील आसा आक्रमक सुर धरला आहे.
Ans: ट्रम्प यांनी इराणसोबत पाच दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे. त्यांनी इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा सुरु असल्याचा दावा केला आहे. परंतु हा दावा इराणने फेटाळला आहे.
Ans: नेतन्याहूंच्या या भूमिकेमुळे मध्यपूर्वेतील शांतता प्रयत्नांना धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे संघर्ष आणकी भडकू शकतो ज्याचा जगाला फटका बसेल.






