
"आज रात्री संपूर्ण संस्कृती नष्ट...", ट्रम्प यांचा मोठा इशारा! इराणमध्ये आज रात्री काहीतरी भयानक घडणार? (फोटो सौजन्य-ChatGPT)
ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खळबळजनक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आजची रात्र जगाच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. त्यांनी इशारा दिला की एक संपूर्ण सभ्यता नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यांना हे असे घडू नये असे वाटते परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.
ट्रम्प यांनी हेही म्हटले की, आता “ संपूर्ण सत्तांतर होत असल्याने, अधिक चांगले आणि कमी कट्टरवादी विचारांचे नेतृत्व पुढे येऊ शकते. त्यामुळे काहीतरी सकारात्मक आणि क्रांतिकारी बदल घडू शकतो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
तसेच, गेल्या ४७ वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचार, अत्याचार आणि हिंसाचाराचा अंत शकतो, असेही त्यांनी नमूद केले. शेवटी ट्रम्प यांनी इराणच्या जनतेला शुभेच्छा देत तुमचे रक्षण करो असे म्हटले…
𝐃𝐨𝐧𝐚𝐥𝐝 𝐉. 𝐓𝐫𝐮𝐦𝐩 𝐓𝐫𝐮𝐭𝐡 𝐒𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐏𝐨𝐬𝐭 𝟎𝟖:𝟎𝟔 𝐀𝐌 𝐄𝐒𝐓 𝟎𝟒.𝟎𝟕.𝟐𝟔 pic.twitter.com/ntXcaNXpg4 — Commentary Donald J. Trump Posts From Truth Social (@TrumpDailyPosts) April 7, 2026
खारग हल्ल्यानंतर काही मिनिटांतच ट्रम्प यांनी ही धमकी दिली. ट्रम्प यांनी दिलेली मुदत अजून काही तासांनी आहे, पण इराणला ज्याची भीती होती ते आता खरे ठरले आहे. अमेरिकेने इराणच्या खारग बेटावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक पूल आणि लष्करी तळांनाही लक्ष्य करण्यात आले. तथापि, जर ट्रम्प यांच्या पोस्टवर विश्वास ठेवायचा झाल्यास, खारग हल्ला हा केवळ एक ट्रेलर होता; आजची रात्र इराणसाठी विनाशकारी ठरू शकते.
ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात Strait of Hormuz खुले करण्यासाठी आणि शांतता करार करण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली होती. यानंतर हा मुदत 48 तासांसाठी वाढवण्यात आली. हा अल्टिमेटम संपण्यासाठी केवळ दोन तास उरले आहेत, याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला कडक शब्दात शेवटचा इशारा दिला आहे.