
Quatar Iran Secrete Deal
US Iran War : आता ‘दलदली’तून बाहेर पडायची वेळी संपली…; इराणचा डोनाल्ड ट्रम्प ‘आरपार’चा इशारा
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने कतारच्या तेल आणि वायू क्षेत्रातील ठिकाणांवर हल्ला न करण्याच्या बदल्यात मोठी रक्कम दिल्याचा दावा समोर आला आहे. सुमारे ५० हजार कोटी कतारने इराणला दिले असून याचा २०२३ मध्ये अमेरिका इराणमधील कैदींच्या अदलाबदली कराराशी संबंधित आहे. २०२३ मध्ये ही रक्कम कतारच्या बँकेत जमा करण्यात आली होती. सध्या ही रक्कम इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC)च्या हाती लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, या करारानंतर कतारच्या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. कतारने मध्यस्थीसाठी नकार दिला आहे. तसेच कतारने युद्धात सहभागी होण्यास, इराणवर हल्ल्यास आणि अमेरिकेला लष्करी मदत करण्यासही नकार दिला आहे. याशिवाय २० मार् २०२६ नंतर इराणने कतारच्या रास लाफान उर्जा केंद्रावर एकही हल्ला केलेला नाही. यामुळे इराणशी झालेल्या गुप्त डीलमुळे हे घडत असल्याचा तज्ज्ञांचा विश्वास आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करारामुळे कतारवरील हल्ले थांबले असले तर याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. इराणच्या पूर्वीच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच होर्मुझ बंद केल्यामुळे गॅस उत्पादनावर परिणाम झाला आहे. सध्या कतारच्या या निर्णयाने जागतिक बाजारपेठेवर आणि अमेरिकेच्या धोरणांवर काय परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
कतारच्या या गुप्त करारादरम्यान दुसरीकडे महासत्ता अरब देश सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि युएई(UAE) ने अमेरिकेकडे इराणवरील कारवाई न थांबवण्याचे मागणी केली आहे. इराणचा धोका पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे असे सौदी-युएईने म्हटले आहे. अरब देशांची ही भूमिका आणि कतारच्या या भूमिकेने जागतिक राजकारणाला वेगळे वळण दिले आहे. यामुळे आता ट्रम्प नक्की काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
Ans: दावा केला जात आहे, कतारने त्यांच्या गॅस आणि उर्जा केंद्रावरील इराणी हल्ले थांबण्यासाठी इराणला सुमारे 6 अब्ज डॉलर देण्याचे मान्य केले आहे.
Ans: कतारने अमेरिका-इराण संघर्षात मध्यस्थीस नकार गिला आहे. तसेच कोणत्याही देशाला समर्थन करणार नाही असे म्हटले आहे.