Middle East War : दुबई पुन्हा हादरलं! इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर विमानतळ तातडीने बंद; थरकाप उडवणार VIDEO आला समोर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Middle East War : होर्मुझची खाडी बनली डेथ ट्रॅप! १७ जहाजांवर भीषण हल्ले; जागतिक व्यापार कोलमडीस?
मिळालेल्या माहितीनुसार, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी(१६ मार्च २०२६) पहाटे अचानक स्फोटांचे आवाज ऐकू येऊ लागले. इराण(Iran)ने विमातळावर ड्रोनने हल्ला केला होता. ड्रोन्स विमानतळांच्या अगदी जवळ असलेल्या इंधन टॅंकला येऊन धडकला. यामुळे मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असून आकाशात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दुबई सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विमानतळ बंद केले आहे. सर्व कामकाज बंद करण्यात आले असून उड्डाणेही स्थगित करण्यात आली आहेत. तसेच येणाऱ्या उड्डाणांनाही परतण्याचा इशारा देण्यात आला आहे. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच फ्लाइट्सचे अपडेट्सही तपासण्यास सांगितले आहेत.
दुबईत आतापर्यंत इराणने केलेला हा दुसरा सर्वात मोठा हल्ला आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यातही इराणने दुबईवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स डागले होते.यामध्ये एका भारतीय नागरिकासह चार जण जखमी झाले होते. मध्यपूर्वेतील अमेरिका(America)-इस्रायल (Israel) विरुद्ध संघर्षात दुबईचा दुसऱ्यांदा बळी गेला आहे. दुबई हे जागतिक आर्थिक आणि पर्यटन केंद्र असून त्यावर हल्ला झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
🇦🇪🇮🇷 Dubai airport reportedly hit in Iranian drone strike. pic.twitter.com/jzkmNfvfHr — Adi Baz (@AdiBazi16) March 16, 2026
Ans: दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील इंधन टॅंकवर इराणने थेट हल्ला केला. ज्यामुळे भीषण स्फोट होऊन आग लागली. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव दुबई विमानतळ बंद करण्यात आले.
Ans: दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्यानंतर प्रशासनाने तातडीने सर्व उड्डाणे तात्पुरत्या काळासाठी स्थगित केली. तसेच विमानतळावर उतरण्यासाठी येणाऱ्या विमानांनाही तातडीने परतण्यास सांगितले. तर प्रवाशांना त्यांच्या फ्लाइट्स अपडेट तपासण्यास सांगितले असून एअरपोर्टवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.






