
Israel Attack on Iran's Heavy Water Nuclear Reactor
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हवाई दलाने शुक्रवारी(२७ मार्च २०२६) इराणच्या महत्त्वाच्या अणू प्रकल्पावर प्रहार केला आहे. इराणमधील अराक येथील शाहिद खोंडाब या हेवी वॉटर कॉम्प्लेक्स आणि यझ्मधील येलोकेक या अणु उत्पादन केंद्रावर हल्ले केले आहे. या हल्ल्यांमुळे इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने संताप व्यक्त केला आहे. इराण(Iran)ने प्रतिशोधाचा इशारा दिला आहे. परिणामी युद्ध अधिक भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इराणच्या अणु उर्जा संघटनेने (AEOI) दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या रिडिएशनचा धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु इराणच्या अण्वस्त्रा हा मोठा प्रहार मानला जात आहे. याशिवाय इस्रायलने तेहरानमधील अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या केंद्रानाही लक्ष्य केले आहे.
इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने इस्रायलला खुले आव्हानं दिले आहे. यावेळी जशास तसे नाही, तर या पेक्षाही भयकंर बदला प्रतिशोध घेतला जाईल असे IRGC ने म्हटले आहे. याशिवाय मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायलशी संबंधित कंपन्यांनाही गंभीर इशारा दिला आहे.
याच वेळी दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी ५ दिवसांची मुदत दिली होती. तसेच इराणशी सकारात्मक चर्चा सुरु असल्याचा दावाही केला होता. मात्र इराणने होर्मुझ मार्ग खुला अद्याप केलेला नाही. तसेच अमेरिकेशी कोणतीही चर्चा सुरु नसून भविष्यात त्यांच्या अटी मान्य होईपर्यंत चर्चा होणार नाही असेही स्पष्ट केले आहे.
हा तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे कच्चा तेलाच्या किमती २.९ टक्क्यांनी वाढल्या आहे. ब्रेंट क्रूड ऑईल देखील १०४.८१ डॉलरवर पोहोचले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर मोठा जागतिक इंधन आणि उर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने अराकमधील हेवी वॉटर कॉम्प्लेक्स आणि यज्द प्रांतातील अर्दकान येलोकेक प्रोडक्शन प्लांटवर हल्ला केला आहे.
Ans: इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणमध्ये कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही, तसेच किरणोत्सर्गाचा धोकाही नाही.
Ans: इराणच्या न्यूक्लियर प्लांट्सवरील हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत प्रचंड तणाव वाढला आहे. ज्याला इराणने प्रत्युत्तर देण्याची चेतावणी दिली आहे. यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.