Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध

Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी न्यूयॉर्क शहरात आयोजित केलेला एक कार्यक्रम वादात सापडला आहे. या कार्यक्रमाला विरोध होत आहे. धार्मिक स्वातंत्र्यावरील एका अमेरिकी समितीने त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 29, 2026 | 05:42 PM
Madison Square Garden Universal Oneness Celebration

Madison Square Garden Universal Oneness Celebration

Follow Us
Follow Us:
  • मॅडिसन स्क्वेअर गार्डनवर कार्यक्रमाचे आयोजन
  • ६१ संघटनांचा तीव्र विरोध
  • महापौर आणि अमेरिकी समितीचा आक्षेप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या अमेरिका दौऱ्यातील मुख्य कार्यक्रमावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला आहे. न्यू यॉर्क शहरातील जगप्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील इन्फोसिस थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमाला स्थानिक मानवाधिकार संघटना, नागरी हक्क गट आणि थेट अमेरिकेतील अनेक हिंदू संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “आरएसएस आणि त्यांची हिंदुत्ववादी विचारधारा समस्त हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाही,” असा आक्रमक पवित्रा घेत ६१ हून अधिक विविध संघटना या कार्यक्रमाविरोधात एकवटल्या आहेत.

हा कार्यक्रम ‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (AHEAD) या मंचाच्या वतीने आयोजित केला गेला असून, या माध्यमातून भागवत हे भारतीय संस्कृती आणि वसुधैव कुटुंबकमचा संदेश देणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या आधीच न्यू यॉर्कच्या राजकीय वर्तुळात आणि आंतरराष्ट्रीय समुदायात याचे पडसाद उमटू लागले आहेत. धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेच्या एका द्विपक्षीय समितीने (USCIRF) भागवत यांच्या व्हिसावर पुनर्विचार करण्याची आणि कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

हिंदू संघटनांचा विरोध अन् खुल्या पत्रावर ६१ संघटनांच्या स्वाक्षऱ्या

मोहन भागवत यांच्या या भाषणाला विरोध करणाऱ्यांमध्ये ‘हिंदू फॉर ह्युमन राइट्स’ (Hindus for Human Rights) ही अमेरिकास्थित प्रमुख हिंदू संघटना आघाडीवर आहे. या संघटनेच्या कार्यकारी संचालक सुनीता विश्वनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत यांच्या कार्यक्रमाचा आणि त्यांच्या विचारसरणीचा निषेध करणाऱ्या एका खुल्या पत्रावर ६१ विविध धार्मिक, सामाजिक आणि धर्मनिरपेक्ष संघटनांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल, इंटरफेथ सेंटर ऑफ न्यू यॉर्क, दलित सॉलिडॅरिटी फोरम यांसारख्या अनेक संस्थांचा समावेश आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mecca Pact Danger: ‘मक्का करारात’ इराण अन् बांगलादेशचा प्रवेश? भारताच्या सुरक्षेला महाधोका; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

आंदोलक संघटनांचे म्हणणे आहे की, संघ प्रमुख मोहन भागवत यांना जागतिक व्यासपीठावर समस्त हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून सादर करणे चुकीचे आहे. “आरएसएसची हिंदुत्ववादी विचारधारा ही समावेशक नसून ती द्वेष आणि भेदभावावर आधारित आहे,” असा आरोप करत या संघटनांच्या सदस्यांनी न्यू यॉर्क सिटी हॉलबाहेर पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. जरी हा खाजगी कार्यक्रम असल्याने तो रद्द करणे प्रशासकीय चौकटीत बसत नसले, तरी या विरोधाचा आवाज बुलंद करण्यासाठी हजारो आंदोलकांनी कार्यक्रमस्थळाबाहेर निदर्शने करण्याचे नियोजन केले आहे.

न्यू यॉर्कचे महापौर झोहरान मामदानी यांचे आक्रमक वक्तव्य

न्यू यॉर्क शहराचे महापौर झोहरान मामदानी यांनी मोहन भागवत यांच्या या कार्यक्रमाला सार्वजनिकरीत्या तीव्र विरोध दर्शवला आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना मामदानी म्हणाले, “मी न्यू यॉर्क शहराचा पहिला भारतीय वंशाचा महापौर म्हणून येथे उभा आहे. माझ्या आईचे कुटुंब आजही भारतात राहते. मला माझ्या कुटुंबाने शिकवलेली भारताची प्रतिमा ही एका धर्मनिरपेक्ष आणि बहुधर्मीय प्रजासत्ताकाची होती, जिथे प्रत्येक नागरिकाला समानतेचे स्थान दिले जाते. मात्र, अशा देशात इतरांना वेगळे पाडणाऱ्या किंवा भेदभावावर आधारित असलेल्या चळवळीचा उदय होणे हे अत्यंत चिंताजनक आहे.”

मामदानी यांनी पुढे स्पष्ट केले की, जरी स्थानिक सरकारला एका खाजगी सभागृहातील कार्यक्रम रद्द करण्याचा कायदेशीर अधिकार नसला, तरी ते वैयक्तिक आणि राजकीयदृष्ट्या या विचारसरणीचा तीव्र निषेध करतात. याचबरोबर काँग्रेसच्या उमेदवारांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीही “न्यू यॉर्क शहरात द्वेषाला स्थान नाही” असे सांगत या कार्यक्रमाचा विरोध केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood: नेपाळ जलप्रलयामुळे बिहारमध्ये सतर्कतेचा इशारा; गंडक, कोसी धरणांचे दरवाजे उघडले, 5 जिल्ह्यांमध्ये 24 तास हाय अलर्ट

आयोजक आणि समर्थकांचे स्पष्टीकरण

दुसरीकडे, आरएसएस आणि आयोजक संस्था AHEAD यांनी या विरोधाला उत्तर देताना स्पष्ट केले आहे की, हा कार्यक्रम अत्यंत शांततापूर्ण आणि संवाद प्रस्थापित करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, सरसंघचालक मोहन भागवत यांचा हा दौरा बहुसांस्कृतिक आणि विविध धर्म मानणाऱ्या लोकांशी संवाद साधण्यासाठी आहे. “हा कार्यक्रम भारतीय तत्त्वज्ञानातील ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे या भावनेवर आधारित आहे,” असे स्पष्टीकरण संघाकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, ‘हिंदू अमेरिकन फाऊंडेशन’ (HAF) सारख्या संघटनांनी महापौर मामदानी यांच्या भूमिकेवर टीका करत, त्यांनी शहरातील सर्व नागरिकांच्या आणि कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडावी, असे आवाहन केले आहे. भागवत यांच्या या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन दौऱ्याकडे संघाच्या शताब्दी वर्षातील जागतिक संपर्काचा भाग म्हणून पाहिले जात असले, तरी न्यू यॉर्कमधील या कार्यक्रमावरून निर्माण झालेला आंतरराष्ट्रीय वाद सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: Mohan bhagwat new york madison square garden event protest zohran mamdani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • mohan bhagwat
  • new york
  • RSS
  • World news

संबंधित बातम्या

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
1

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
2

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
3

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज
4

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.