युरोपीय देश इटलीमध्ये भीषण अपघात (Italy Bus Accident ) झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात 21 जणांचा मृत्यू असून 18 जण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार व्हेनिस शहराजवळ मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या बसमध्ये अनेक विदेशी प्रवासीही होते. मृतांमध्ये पाच युक्रेनियन आणि एक नागरिक आहे.
[read_also content=”वाराणसीत दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू! https://www.navarashtra.com/india/8-people-of-same-family-died-in-rod-accident-near-varanasi-nrps-465463.html”]
स्काय इटालियाने दिलेल्या माहितीनुसार, ही बस व्हेनिसच्या ऐतिहासिक केंद्रातून कॅम्पिंगच्या ठिकाणी परतत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये 40 लोक होते. यापैकी 21 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून, अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
व्हेनिस सिटी हॉलने सांगितले की, जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. सायंकाळी 7.45 च्या सुमारास झाला जवळ हा अपघात झाला. बस पॉवर लाईन्स पुलापासून सुमारे 15 मीटर खाली पडली आणि आग लागली.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni ) यांनी व्हेनिसच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. सरकारची सहानुभूती “पीडित, त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहे” असं त्यांनी म्हण्टलं आहे.
अलिकडच्या वर्षांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला. 2017 मध्ये, हंगेरियन विद्यार्थ्यांना कोना जाने येथे घेऊन जाणार्या बसला वेरोना या उत्तरेकडील शहराजवळ अपघात झाला. 16 जणांचा मृत्यू झाला. 2013 मध्ये दक्षिण इटलीमध्ये एका पुलावरून बस पडून 40 जणांचा मृत्यू झाला होता.