पालकमंत्री नितेश राणे (फोटो- सोशल मीडिया)
जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांचा आढावा
दर्जात्मक बाबींमध्ये कुठलीही तडजोड नको
कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई
सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. जिल्हा परीषदेने आराखड्यात घेतलेली विकास कामे जानेवारी अखेरपर्यंत गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिले, पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हा परीषदेच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला.
दर्जात्मक बाबींमध्ये कुठलीही तडजोड नको
पालकमंत्री नीतेश राणे पुढे म्हणाले की, सर्व यंत्रणांनी घेतलेली कामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची असल्याने सर्वांनी जबाबदारीणे काम करावे. प्रत्येक काम है दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावे. जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी शाश्वत गुणवत्तापूर्ण कामाची आखणी करताना दर्जात्मक बाबींमध्ये कुठलीही तडजोड करू नये. तसेब जिल्हा परीषदेला विकासात्मक कामासाठी दिलेला निधी वेळेत खर्च करावा. कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित राहणार नाही तसेच निधी समर्पित होणार नाही याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
अधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळेस जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री परब, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, तसेच जिल्हा परीषदेच्या विविध त्रणाचे अधिकारी उपस्थित होते.
काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने करा
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जयगड, रत्नागिरी बंदरातून काजू निर्यात संदर्भातील आढावा बैठकीत दिल्या. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप लाड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने करा! मंत्री नितेश राणे यांच्या सूचना
मंत्री. राणे म्हणाले की, जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात झाल्यास त्याचा फायदा काजू उत्पादकांना होईल. या बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक असलेले परवाने तातडीने मिळावेत यासाठीही संबंधित विभागाने कार्यवाही करावी. या आढावा बैठकीत पणन मंडळ, स्मार्ट व मॅग्नेट, एफएसएसआय, रेल्वे या विभागाकडील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






