आग्नेय आफ्रिकेतील असलेल्या मोझांबिक देशात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मोझांबिकच्या उत्तर किनाऱ्यावर गर्दीने भरलेली बोट बुडाल्याने (Mozambique Boat Sinks) 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोझांबिकच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी नामपुला प्रांताजवळील एका बेटावर ही बोट जात होती. यावेळी बोटमध्ये जवळपास 130 लोकं प्रवास करत होते. मात्र, अचानक ही बोट बुडाली आणि 90 लोकांना जलसमाधी मिळाली.
[read_also content=”हिंदू विवाहासाठी कन्यादान विधी कायद्याने आवश्यक नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निरीक्षण! https://www.navarashtra.com/india/allahabad-hight-court-says-kanyadan-ceremony-is-not-legally-necessary-for-hindu-marriage-nrps-521436.html”]
रिपोर्टनुसार,रविवारी (७ एप्रिल) ही घटना घडली. नामपुला राज्य सचिव जैमे नेटो यांनी सांगितले की बोट क्षमतेपेक्षा जास्त लोक घेऊन जात होती. ती प्रवाशांना घेऊन जाण्यासही योग्य नव्हती. यामुळे बोट उलटून बुडाली. मृतांमध्ये अनेक मुलेही आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं. प्रवाशांचा शोध घेताना मोझांबिकच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर 5 जण जिवंत सापडले असून अजून अनेकांचा शोध सुरू आहे. मात्र, सागरी परिस्थितीमुळे शोध मोहिमेत अडचणी येत आहेत.
अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाताच्या वेळी बोट मोझांबिक बेटाकडे जात होती, जे एक छोटे प्रवाळ बेट आहे. हे बेट प्रथम पोर्तुगीजांनी पूर्व आफ्रिकेची राजधानी मानले होते. हे प्रसिद्ध संशोधक वास्को द गामा यांनी शोधले होते.