गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडेच आनंदी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होतं. महाराष्ट्रात तर हा सण सर्वात मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो. सर्वत्र बाप्पाचे जोरदार स्वागत होत आहे. सकाळपासूनच वातावरणात एक वेगळीच गोडी जाणवते. अशातच आता रिंकूनेही तिच्या घरच्या गणपतीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच तिचे साधे आणि सुंदर फोटो पाहून चाहते चकीत झाले आहेत.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रिंकू राजगुरूने शेअर केले खास फोटो (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रिंकू राजगुरुने गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका खास पोस्ट शेअर केली आहे. तिने गणपती बप्पासोबत फोटो शेअर करून, तिने चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रिंकूने तिच्या घरच्या गणपतीसोबतच फोटो तिच्यासोबत तिची गोंडस मांजरही दिसत आहे. दोघीही पोझ देताना दिसत आहेत. रिंकूने फोटोमध्ये पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.
साडी नेसून रिंकूने फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया". या पोस्टवर चाहते कमेंट करुन म्हणत आहेत की, "खूप छान, साधेपणा एकदम उठून दिसतो आहे".
तसेच रिंकूने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये ती पाठमोरी बसली आहे. तसेच अभिनेत्रीने केसात गजरा देखील माळला आहे. रिंकूचा हा साधा आणि सुंदर लूक पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रिंकू राजगुरूने शेअर केले खास फोटो (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)