Myanmar Earthquake: भूकंपातील मृतांची संख्या 3 हजार पार, 5 हजार लोक जखमी; शेकडो बेपत्ता (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बॅंकॉक: सुमारे एक आठवड्यापूर्वी म्यानमार 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्याने हादरला होता. या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला. दरम्यान मृतांचा आकडा 3 हजार पार झाला असून 4 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच 341 लोक अद्यापही बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बचावकार्य जोरात सुरु असून मलब्याखाली अडकलेल्या लोकांना वाचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारने या भयानक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ एका आठवड्यासाठी राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा जाहीर केली आहे.
भूकंपामुळे हजारो इमारती कोसळल्या आहेत. रस्ते आणि पूल उदध्वस्त झाले आहेत. स्थानिक माध्यांमानी दिलेल्या माहितीनुसारह, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दूरसंचार सेवाही विस्कळीत झाली असून अनेक लोकांनापर्यंत मदत पोहोचणे कठीण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, चार रुग्णालये आणि एक आरोग्य केंद्रे देखील उदध्वस्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 32 रुग्णालये आणि 18 आरोग्य केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. भारताकडून तात्पुरत्या काळासाठी एक मोबाईल हॉस्पिटल आणि रशिया-बेलारुसकडून एक संयुक्त हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.
2021 मध्ये म्यानमारमध्ये गृहयुद्धास सुरुवात झाला होती. एकीकडे म्यानमार गृहयुद्धच्या संघर्षात अडकलेला असून हा भाग भुकंपामुळे आधीच संकटग्रस्त आहे. यामुळे देशातील मानवीय परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. सध्या 22 एप्रिलपर्यंत तात्पुरती युद्धंबदी जाहीर करम्यात आली आहे. मात्र संघर्षादरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
म्यानमारच्या भूकंपाटा फटका थायलंडची राजधानी ब२कॉमध्ये बसला आहे. बॅंकॉमध्ये बांधकाम सुरु असलेली एक इमारती कोसळली असून यामद्ये 22 जणांचा मृत्यू आणि 35 जण जखमी झाले आहेत. सध्या ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकाचे कार्य सुरु हे. मात्र अद्याप कोणीही जिवंत सापडलेले नाही.
EQ of M: 4.7, On: 01/04/2025 16:31:49 IST, Lat: 21.94 N, Long: 95.97 E, Depth: 18 Km, Location: Myanmar.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/fKdAyNBHTU — National Center for Seismology (@NCS_Earthquake) April 1, 2025
दरम्यान मंगळवारी 01 एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी मान्यामारमध्ये पुन्हा एकदा 4.7 तीव्रतेच्या भूकंपाचा झटका जाणवला होता. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा दणका म्यानमारला बसला.
भारताने ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले असून, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी यांगूनला मदत सामग्री पोहोचवली आहे. यात अन्नधान्य, औषधे आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी आवश्यक सामग्रीचा समावेश आहे.






