Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Nepal Flood : पुराच्या पाण्यात एक घर भक्कमपणे उभे असलेले दिसले. जवळच इमारती आणि ढिगारे तरंगत होते, तर घराच्या बाल्कनीमध्ये तीन लोक दिसले. वाचा याबाबत सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 30, 2026 | 04:21 PM
Nepal flash flood green house video Nepal flood viral green house standing

Nepal flash flood green house video Nepal flood viral green house standing

Follow Us
Follow Us:
  • प्रचंड महाप्रलयात अचल उभे राहिलेले घर
  • बाल्कनीत अडकलेले कुटुंब सुखरूप
  • अभियांत्रिकीचे कौशल्य आणि निसर्गाचा कोप

नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाने मांडलेल्या भयंकर तांडवाचे अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक व्हिडिओ सध्या जगभरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हिमनदी कोसळल्यामुळे आणि पुराचे पाणी अचानक आल्यामुळे (Nepal Flash Flood) काही मिनिटांतच संपूर्ण गावेच्या गावे चिखल, दगड आणि पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली. या प्रलयामध्ये मोठमोठ्या इमारती, पूल आणि गाड्या खेळण्यांसारख्या पात्रात गहाळ झाल्या. मात्र, या भीषण विनाशाच्या मध्यभागी एक असा चमत्कार पाहायला मिळाला, ज्याने इंटरनेटवरील कोट्यवधी युजर्सना चक्रावून सोडले आहे. पुराच्या रौद्ररूपा समोर संपूर्ण परिसर उद्ध्वस्त होत असताना एक दुमजली फिरोजी (हिरव्या) रंगाचे घर महाकाय लाटांशी दोन हात करत अचल उभे राहिले.

व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, चिखल आणि ढिगाऱ्याने भरलेला पाण्याचा महाकाय प्रवाह घराच्या दोन्ही बाजूने प्रचंड वेगाने वाहत आहे. आजूबाजूच्या वास्तू पाण्याच्या धडकेने कोसळत असताना, या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीत तीन व्यक्ती ज्यामध्ये एक पुरुष, महिला आणि लहान मुलगी असल्याचे दिसत होते अत्यंत शांतपणे आणि अगतिकपणे उभे राहिलेले दिसले. चारी बाजूंनी मृत्यूचे थैमान सुरू असताना, हे कुटुंब आपल्या डोळ्यांदेखत आजूबाजूचा परिसर नष्ट होताना पाहत होते. सुरुवातीला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या कुटुंबाचे काय झाले असावे, याबाबत जगभरातून मोठी चिंता व्यक्त केली जात होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन् 3D VIDEO

कुटुंब सुखरूप वाचले; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

या थरारक घटनेनंतर काही तासांतच समोर आलेल्या ताज्या व्हिडिओंनी आणि माहितीने लाखो लोकांना मोठा दिलासा दिला. पुराचा मुख्य लोट ओसरल्यानंतरही ते घर जसेच्या तसे भक्कम उभे राहिल्याचे आणि बाल्कनीत अडकलेले तिन्ही नागरिक सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. इंटरनेटवर या घराला “मिराकल हाऊस” (चमत्कारिक घर) असे संबोधले जात असून, या घराचे बांधकाम करणाऱ्या सिव्हिल इंजिनिअरच्या कौशल्याचे जगभरातून कौतुक केले जात आहे. बांधकामाची मजबुती आणि योग्य पाया (Foundation) जर योग्य असेल, तर निसर्गाच्या मोठ्या कोपाविरुद्धही ते ढाल बनून उभे राहू शकते, याचे हे प्रत्यक्ष उदाहरण ठरले आहे.

Good News,
Dear citizens of world,
All those were praying and worried about what happened to people in the Green House during the catastrophic Nepal Floods The family and house survived the ordeal. pic.twitter.com/iElo4qXvBL — Woke Eminent (@WokePandemic) August 28, 2026

credit – social media and Twitter

बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हे घर आरसीसी (RCC) पिलर, बीम आणि प्लिंथ फ्रेमवर्क पद्धतीचा वापर करून बांधण्यात आले होते. पुराच्या पाण्यासोबत आलेल्या मलब्याचा थेट फटका पायाला बसण्याऐवजी पाण्याचा प्रवाह घराच्या आजूबाजूने निघून गेला, ज्यामुळे या इमारतीचा पाया उखडला गेला नाही आणि कुटुंब वाचले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी

नेपाळमधील महापुरात ६०० हून अधिक बळी

या एका चमत्कारिक बचावाच्या बातमीने दिलासा दिला असला, तरी नेपाळमधील पुराची एकंदरीत परिस्थिती अत्यंत गंभीर आणि भीषण आहे. नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात आलेल्या या जलप्रलयात आतापर्यंत ६०० हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २५०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता किंवा संपर्काबाहेर आहेत. यामध्ये शेकडो भारतीय पर्यटकांचा आणि कामगारांचाही समावेश आहे. नेपाळ लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापन पथके हेलिकॉप्टर व बोटींच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य राबवत आहेत. भूस्खलन आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत.

Web Title: Nepal flash flood viral green house family survived video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Nepal Flash Flood
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी
1

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर
2

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप
3

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप

India Bhutan Railway: भारत आणि भूतान दरम्यान धावणार पहिली आंतरराष्ट्रीय ट्रेन; भारताच्या ₹4,000 कोटींच्या प्रकल्पाने चीन अस्वस्थ
4

India Bhutan Railway: भारत आणि भूतान दरम्यान धावणार पहिली आंतरराष्ट्रीय ट्रेन; भारताच्या ₹4,000 कोटींच्या प्रकल्पाने चीन अस्वस्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.