
nepal government clarification indian tourists stay limit rules 2026
Nepal India Border Rules 2026 : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि काही न्यूज पोर्टल्सवर भारत-नेपाळ सीमा नियमांबाबत अनेक बातम्या फिरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतीय पर्यटकांना नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत, त्यांच्या मुक्कामावर ३० दिवसांची मर्यादा घातली आहे आणि ओळखीचा पुरावा सक्तीचा केला आहे, असा दावा करण्यात येत होता. या सर्व बातम्यांमुळे भारतीय पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता या प्रकरणावर ‘नेपाळ पर्यटन मंडळाने’ (Nepal Tourism Board) अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
नेपाळ पर्यटन मंडळाने स्पष्टपणे सांगितले आहे की, “भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आहेत. नेपाळ सरकारने भारतीय पर्यटकांच्या वास्तव्यावर कोणतीही नवीन कालमर्यादा (३० दिवसांची मर्यादा) घातलेली नाही. तसेच सीमेवरील खुल्या सीमा व्यवस्थेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.” मंडळाने पुढे असेही म्हटले आहे की, प्रवाशांना त्रास देण्यासाठी नाही, तर त्यांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी नवीन बदल केले जात आहेत.
Nepal Tourism Board urges the public and media to refrain from spreading unverified reports regarding travel restrictions on Indian Tourists pic.twitter.com/6K6WVTfAI6 — Nepal Tourism Board (@nepaltourismb) May 13, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WarThreat: ‘आता मुंबई लक्ष्य, युद्ध सीमेवर नाही, तर भारताच्या…!’ असीम मुनीर पुन्हा भारताविरुद्ध भुंकला, योजनेचा अजब उलगडा
अनेकांनी असा दावा केला होता की, पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींनंतर अवैध घुसखोरी रोखण्यासाठी नेपाळने ओळखपत्रे अनिवार्य केली आहेत. मात्र, पर्यटन मंडळाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. अधिकृत नियमांनुसार, जर तुम्ही विमानाने नेपाळला जात असाल, तर तुम्हाला मूळ पासपोर्ट किंवा भारतीय निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (Voter ID) सादर करणे आवश्यक आहे. रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी जुनेच नियम लागू आहेत. विशेष म्हणजे, नेपाळमध्ये प्रवेशासाठी व्हिसाची गरज नाही, ही तरतूद आजही कायम आहे.
BREAKING NEWS : Indian tourists will be permitted to stay in Nepal for a maximum of 30 days under a new rule introduced by the Balen government. — WINTRACK INC (@wintrackinc) May 12, 2026
credit – social media and Twitter
पर्यटन विभागाने भारतीय पर्यटकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता स्वतःच्या वाहनाने (कार किंवा दुचाकी) नेपाळला जाणाऱ्या भारतीयांना सीमाशुल्क विभागात रांगेत उभे राहण्याची गरज नाही. नेपाळने यासाठी एक नवीन ‘ऑनलाइन डिजिटल प्रणाली’ विकसित केली आहे. या पोर्टलवर जाऊन पर्यटक आगाऊ नोंदणी करू शकतात आणि आपले तात्पुरते परवाना शुल्क भरू शकतात. यामुळे सीमा तपासणी नाक्यांवरील वेळ वाचणार असून पर्यटकांचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.
Nepal Awaits You: Close to India, Close to the Heart.
-No Visa. No Hassle. Just Heart ❤️.
-No Limit. Only Experience.
-Use a Passport or Voter ID.
-Fly ✈️ or Drive Your Own car 🚙 . Register for a Vehicle Entry Permit: https://t.co/GlKp1eixsK
🇳🇵 🤝 🇮🇳 @MofaNepal @nepaltourismb pic.twitter.com/ye7JvSBYIo — Nepal Embassy, India (@EONIndia) May 13, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S Jaishankar : विज्ञानातील ‘ऐतिहासिक विकृती’ आता संपणार! परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडली परखड भूमिका
नेपाळी माध्यमांनी यापूर्वी मोरंगच्या स्थानिक प्रशासनाचा हवाला देऊन सुरक्षा कडक केल्याचे म्हटले होते. मात्र, नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, अंतर्गत सुरक्षेसाठी केलेली नियमित तपासणी आणि आंतरराष्ट्रीय सीमा नियम यात फरक आहे. “नेपाळ तुमची वाट पाहत आहे, भारताच्या जवळ, हृदयाच्या जवळ” अशा शब्दांत नेपाळने भारतीयांचे स्वागत केले आहे. त्यामुळे पर्यटकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नेपाळ सहलीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.