Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Andaman Tribes: 50,000 वर्षांपासून अलिप्त! अंदमानच्या ‘मृत्यूच्या बेटावर’ का गेला अमेरिकन तरुण? 1 वर्ष लपलेलं रहस्य अखेर जगासमोर

North Sentinel Island : एक अमेरिकन माणूस अंदमानमधील सर्वात रहस्यमय जमात असलेल्या सेंटिनेलींना भेटायला का गेला? कारण त्यांनी पहिल्यांदाच उघड केले की ते बाहेरच्या लोकांना ठार मारतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 28, 2026 | 01:13 PM
north sentinel island andaman american youtuber mikhailo polyakov sentinelese tribe mystery

north sentinel island andaman american youtuber mikhailo polyakov sentinelese tribe mystery

Follow Us
Follow Us:
  • रहस्यमय घुसखोरीचा खुलासा
  • एक तासाचा थरार आणि कोका-कोला
  • मृत्यूचे बेट

North Sentinel Island Mystery 2026 : अंदमान आणि निकोबार (Andaman And Nicobar) द्वीपसमूहातील ‘नॉर्थ सेंटिनेल बेट’ (North Sentinel Island) हे जगातील अशा मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे जाणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देणे होय. या बेटावर राहणारी ‘सेंटिनेली’ (Sentinelese) जमात ही आधुनिक मानवी संस्कृतीपासून पूर्णपणे अनभिज्ञ आणि अत्यंत हिंसक मानली जाते. भारत सरकारने या बेटावर जाण्यास कायद्याने संपूर्ण बंदी घातली आहे. असे असतानाही, गेल्या वर्षी एका अमेरिकन यूट्यूबरने जीवाची पर्वा न करता या प्रतिबंधित बेटावर पाऊल ठेवले होते, ज्याला नंतर अटक करण्यात आली. आता या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, त्या मिखाइलो व्हिक्टोरोविच पोल्याकोव्ह नावाच्या तरुणाने या आत्मघातकी मोहिमेमागचे गुपित पहिल्यांदाच उघड केले आहे.

फक्त ‘हॅलो’ म्हणण्यासाठी मृत्यूच्या दारात!

अमेरिकन यूट्यूबर मिखाइलो व्हिक्टोरोविच पोल्याकोव्हने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याला या रहस्यमय लोकांशी कोणताही वाद घालायचा नव्हता, तर त्याला केवळ त्यांना ‘हॅलो’ म्हणायचे होते आणि त्यांच्याशी संपर्क साधायचा होता. तो जेव्हा गुप्तपणे बेटाच्या किनाऱ्यावर पोहोचला, तेव्हा तिथे त्याला कोणताही स्थानिक माणूस दिसला नाही. त्याने त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही वेळ जोरात शिट्ट्या देखील वाजवल्या. परंतु, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तो तिथे त्यांच्यासाठी एक भेटवस्तू ठेवून परत आला. ही भेटवस्तू दुसरी तिसरी काही नसून ‘कोका-कोलाचा कॅन’ (Coke Can) होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Abraham Accords: ‘इस्रायलला पाठिंबा दिला तर गाडून टाकू!’ Lashkar e Taibaची पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुखांना थेट धमकी

कोका-कोलाच्या कॅनमुळे संपूर्ण जमात झाली असती नष्ट?

पोल्याकोव्हने केवळ एका ‘कोक’च्या कॅनसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला यावर जगभरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, पर्यावरणवादी आणि मानववंशशास्त्रज्ञांनी त्याच्या या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तज्ज्ञांच्या मते, बाह्य जगापासून हजारो वर्षे अलिप्त राहिल्यामुळे सेंटिनेली लोकांची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) अत्यंत कमकुवत आहे. आधुनिक जगातील साधी सर्दी, खोकला किंवा फ्लूचा विषाणूही या संपूर्ण जमातीला एका झटक्यात नष्ट करू शकतो. पोल्याकोव्हने तिथे ठेवलेल्या कॅन किंवा वस्तूंवर जर एखादा विषाणू असता, तर आज ही जगातील सर्वात जुनी जमात पृथ्वीवरून नामशेष झाली असती. त्यामुळे त्याच्या या बेजबाबदारपणावर कडक टीका होत आहे.

YouTuber Mykhailo Polyakov who risked his life sailing to North Sentinel Island to leave a Diet Coke for the world’s most isolated tribe escaped a 5 year prison sentence with a $161 fine He was ordered to surrender his footage, he posted it to YouTube anyway pic.twitter.com/INVO1ULQWq — Wild Posts (@wildpostss) May 26, 2026

credit – social media and Twitter

बाण आणि भाल्यांनी होते बाहेरच्यांचे स्वागत!

सेंटिनेल बेटावर राहणारे लोक बाह्य जगाचा प्रचंड द्वेष करतात. इतिहास साक्षी आहे की, जेव्हा जेव्हा एखादे जहाज, बोट किंवा हेलिकॉप्टर या बेटाच्या जवळ गेले आहे, तेव्हा सेंटिनेली लोकांनी त्यांच्यावर विषारी बाण आणि भाल्यांचा पाऊस पाडला आहे. २०१८ मध्ये जॉन अ‍ॅलन चाऊ नावाचा एक अमेरिकन ख्रिश्चन धर्मप्रसारक (Missionary) या लोकांना ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्याच्या वेड्या हट्टाने या बेटावर गुपचूप गेला होता. मात्र, बेटावर पाय ठेवताच सेंटिनेली लोकांनी बाण मारून त्याची निर्घृण हत्या केली आणि त्याचा मृतदेह किनाऱ्यावर पुरून टाकला. भारत सरकारलाही त्याचा मृतदेह तिथून बाहेर काढता आला नाही, कारण तिथे जाणे लष्करासाठीही धोक्याचे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Buffalo: सोशल मीडियाच्या ताकदीने वाचला 700 किलोच्या ‘डोनाल्ड ट्रम्प’चा जीव; बांगलादेश सरकारने खरेदीदाराचे पैसे का केले परत?

कोण आहेत हे सेंटिनेली लोक?

सेंटिनेली लोक हे आशिया खंडातील शेवटचे ‘अस्पर्शित’ (Uncontacted) मानले जातात. त्यांच्या शारीरिक रचनेवरून आणि वैशिष्ट्यांवरून ते अंदमानमधील दुसऱ्या जारावा (Jarawa) जमातीसारखेच दिसतात. मात्र, ते जारावा लोकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आक्रमक आहेत. त्यांचे राहणीमान आजही अश्मयुगीन काळासारखे आहे. ते शेती करत नाहीत, तर केवळ शिकार आणि मासेमारीवर जगतात. त्यांची स्वतःची एक वेगळी भाषा आहे, जी अंदमानमधील इतर कोणत्याही जमातीला समजत नाही. एका अंदाजानुसार, आज या बेटावर केवळ ५० ते १०० सेंटिनेली लोकच जिवंत उरले आहेत. म्हणूनच, भारत सरकारने या बेटाच्या चारही बाजूंनी ५ किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे, जेणेकरून या प्राचीन मानवी वारशाचे रक्षण करता येईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंदमानचे नॉर्थ सेंटिनेल बेट का धोकादायक मानले जाते?

    Ans: कारण तिथे राहणारी सेंटिनेली जमात बाह्य जगापासून ५०,००0 वर्षांपासून अलिप्त असून, बेटावर येणाऱ्या प्रत्येक परक्या व्यक्तीची ते बाण आणि भाल्याने हत्या करतात.

  • Que: अमेरिकन यूट्यूबर पोल्याकोव्हने सेंटिनेल बेटावर काय केले होते?

    Ans: यूट्यूबर मिखाइलो पोल्याकोव्ह गुप्तपणे बेटावर गेला, तिथे शिट्ट्या वाजवून सेंटिनेली लोकांसाठी एक कोका-कोलाचा कॅन भेट म्हणून ठेवून परत आला.

  • Que: सेंटिनेल बेटावर जाण्यास बंदी का आहे?

    Ans: सेंटिनेली लोकांच्या हिंसक प्रवृत्तीपासून बाहेरच्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि आधुनिक आजारांपासून या दुर्मिळ जमातीचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने तिथे जाण्यास पूर्ण बंदी घातली आहे.

Web Title: North sentinel island andaman american youtuber mikhailo polyakov sentinelese tribe mystery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • andman and nicobar
  • tribes
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
1

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी
2

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर
3

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप
4

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.