Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Boat Accident: उत्तर सायप्रसजवळ 270 प्रवाशांनी भरलेली सागरी फेरी समुद्रात उलटली; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 25 प्रवासी बेपत्ता

Northern Cyprus Boat Accident : उत्तर सायप्रसजवळ सुमारे २७० प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एक फेरी उलटली, त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण बेपत्ता झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 31, 2026 | 10:43 AM
Mersin Tasucu ferry capsizes Mediterranean

Mersin Tasucu ferry capsizes Mediterranean

Follow Us
Follow Us:
  • समुद्रात भीषण अपघात
  • मोठी बचाव मोहीम
  • व्हिएतनाममधील दुर्घटना

उत्तर सायप्रसच्या  किनारपट्टीवर एक भीषण आणि अत्यंत हृदयद्रावक सागरी अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर सायप्रसमधून तुर्कस्तानकडे निघालेली एक प्रवासी फेरी सुमारे २७० प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जात असताना अचानक समुद्रात उलटली (Boat Accident) . या दुर्दैवी घटनेत किमान ८ जणांचा बुडून मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत. अपघाताची बातमी समजताच स्थानिक आपत्कालीन यंत्रणा आणि सागरी सुरक्षा दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम सुरू केली. आतापर्यंत २३७ प्रवाशांना समुद्रातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

मिळालेल्या सविस्तर वृत्तानुसार, ही दुर्घटनाग्रस्त फेरी उत्तर सायप्रसमधील प्रसिद्ध किरेनिया (ज्याला स्थानिक भाषेत ‘गिर्ने’ म्हटले जाते) या बंदरातून तुर्कस्तानच्या मेर्सिन प्रांतातील तास्कू बंदराच्या दिशेने रवाना झाली होती. परंतु, आपले गंतव्यस्थान असलेल्या मेर्सिन बंदरावर पोहोचण्यापूर्वीच, किनाऱ्यापासून अवघ्या ७.५ किलोमीटर अंतरावर फेरीचा तोल ढासळला आणि ती समुद्रात उलटली. दुर्घटनेच्या वेळी समुद्रात लाटांचा वेग प्रचंड होता आणि अचानक निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे फेरी चालक उपकरणांवरचा ताबा गमावून बसला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Letter Writing Day: डिजिटल युगात हरवत चाललेला स्नेहाचा धागा; हाताने लिहिलेल्या शब्दांमधील भावनांचा, आठवणींचा समृद्ध वारसा

प्रवासाच्या अवघ्या १५ मिनिटांतच घडली दुर्घटना

उत्तर सायप्रसचे पंतप्रधान उनाल उस्टेल यांनी या दुर्घटनेची अधिकृत पुष्टी करत या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, बंदरातून निघाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांच्या आतच फेरी अत्यंत खराब हवामानामुळे आणि जोरदार लाटांमुळे समुद्राचे पाणी आत शिरल्याने बुडू लागली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच फेरीवरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ ‘मेडे’ (Mayday) आपत्कालीन संदेश पाठवून मदतीची याचना केली. संदेश मिळताच जवळच्या सागरी तटरक्षक दलाच्या बोटी आणि हेलिकॉप्टर घटनास्थळाकडे रवाना झाले.

किरेनिया शहराचे महापौर मुरात सेनकुल यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, ही दुर्दैवी घटना उत्तर सायप्रसच्या उत्तर किनारपट्टीवरील डायना बीचजवळ घडली. अपघात घडल्यानंतर काही मिनिटांतच सोशल मीडियावर या घटनेचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ व्हायरल झाले. या व्हिडिओंमध्ये समुद्राच्या अथांग पाण्यात लाल रंगाचे लाईफ जॅकेट घालून प्रवाशी पोहण्याचा प्रयत्न करताना आणि मदतीसाठी आकांत करताना दिसत आहेत. बचाव पथकांनी युद्धपातळीवर काम करत २३७ जणांना पाण्याबाहेर काढले, मात्र समुद्रातील खोल पाणी आणि अंधारामुळे बेपत्ता २५ प्रवाशांचा शोध घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

जुलै महिन्यात व्हिएतनाममध्येही घडली होती भारतीय पर्यटकांची अशीच दुर्घटना

समुद्रातील बोट अपघातांची मालिका केवळ इथेच थांबलेली नाही. या दुर्घटनेच्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच जुलै महिन्याच्या सुरुवातीला व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ अशीच एक भयंकर घटना घडली होती. ३२ भारतीय पर्यटक आणि ४ स्थानिक कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एक हाय-स्पीड बोट होन मे रॅट न्गोई परिसरात अचानक समुद्रात उलटली होती. या दुर्दैवी अपघातात १५ भारतीय पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता.

व्हिएतनाम अपघातातील मृत पर्यटकांमध्ये भारतातील तामिळनाडूतील १०, आंध्र प्रदेशातील ३ आणि केरळ राज्यातील २ नागरिकांचा समावेश होता. या दोन्ही दुर्घटनांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी पर्यटनातील सुरक्षा मानकांवर आणि सुरक्षेच्या उपायांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या उत्तर सायप्रसमधील अपघाताचा स्थानिक अधिकारी सखोल तपास करत असून बेपत्ता प्रवाशांना शोधण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि तटरक्षक दलाच्या बोटींच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू आहे.

Web Title: Northern cyprus boat accident 270 passengers turkey marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • Boat Accident
  • Turkey
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flash Flood: ‘चीनने ग्लेशियरची योग्य माहिती दिली नाही…’, नेपाळचा चीनवर आरोप
1

Nepal Flash Flood: ‘चीनने ग्लेशियरची योग्य माहिती दिली नाही…’, नेपाळचा चीनवर आरोप

North Cyprus Ferry Accident : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ 267 जणांना घेऊन जाणारी फेरी उलटली; बचावकार्य सुरू
2

North Cyprus Ferry Accident : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ 267 जणांना घेऊन जाणारी फेरी उलटली; बचावकार्य सुरू

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
3

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी
4

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.