नेपाळमधील पुराचा तब्बल 32000 पेक्षा जास्त लोकांना फटका; मृतांचा आकडाही वाढतोय, हजारो लोक बेघर (संग्रहित फोटो)
काठमांडू : नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी अचानक पूर आला. या पुरामुळे जनजीवन अक्षरश: ठप्प झाल्याचे पाहिला मिळाले. नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे ३२००० पेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत १२९५ लोकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते, पूल, शाळा आणि आरोग्य केंद्रेही उद्ध्वस्त झाली आहेत.
नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे ३२००० हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. रस्ते, पूल, शाळा आणि आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले आहे. ही माहिती शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारच्या प्राथमिक अहवालात उघड झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) हा अहवाल तयार केला आहे. प्राधिकरणाने शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत हा अहवाल सादर केला. अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा १२९५ वर पोहोचला आहे. पूरग्रस्त भागातून आणखी मृतदेह सापडल्यानंतर मृतांचा आकडा वाढला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russian Oil: ‘तेल खरेदीने युद्ध संपणार नाही’; अमेरिकेच्या 100% टॅरिफच्या धमकीला एस. जयशंकर यांचे चोख उत्तर
दरम्यान, वाहतुकीसाठी वापरले जाणारे सुमारे ५५ किलोमीटरचे रस्ते पूर्णपणे खराब झाले. याव्यतिरिक्त, ३७ पूल पूर्णपणे खराब झाले. ६८ झुलत्या पुलांचेही नुकसान झाले. तथापि, नुकसानीचे सविस्तर मूल्यांकन अद्याप पूर्ण झालेले नाही.
पुरामुळे कोट्यवधींचे नुकसान
या आपत्तीमुळे ८०० अब्ज रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा सध्या केला जात आहे. आपत्तीनंतर गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी तातडीने कारवाई न केल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीकाही केली.
सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता
अचानक आलेल्या विनाशकारी पूर आणि भूस्खलनामुळे देशातील अनेक शहरे आणि गावे उध्वस्त झाली आहेत. या भीषण आपत्तीत सर्वात मोठा फटका रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांना बसला असून, येथे शिकणारी सुमारे ६०० हून अधिक शाळकरी मुले आणि त्यांचे शिक्षक एकाएकी गायब झाले आहेत. २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेवर हिमनग आणि कडे कोसळल्यामुळे (Ice-rock avalanche) भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांना अचानक प्रचंड पूर आला. पुराच्या या रौद्ररुपाने अवघ्या काही मिनिटांतच परिसर जलमय केला, ज्यामध्ये अनेक शाळा, घरे आणि रस्ते वाहून गेले.






