Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीरियात रक्तरंजित तांडव; एक हजाराहून अधिक मृत्यू, महिलांची नग्न परेड आणि हिंसाचाराने हैराण देश

सीरियातील हिंसाचारात एक हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. सीरियाच्या अंतरिम सरकारने बशर अल-असाद समर्थकांवर हल्ले सुरू केले आहेत. लताकिया आणि टार्टस या देशाच्या किनारी भागात सरकारने मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 10, 2025 | 10:09 AM
Over a thousand dead as Syria's interim government attacks Assad supporters in Latakia and Tartus

Over a thousand dead as Syria's interim government attacks Assad supporters in Latakia and Tartus

Follow Us
Close
Follow Us:

दमास्कस : सीरियात पुन्हा एकदा भीषण रक्तपात सुरू झाला असून, या हिंसाचारात आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. सीरियाच्या अंतरिम सरकारने माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांच्या समर्थकांवर थेट हल्ले चढवले आहेत. विशेषतः लताकिया आणि टार्टस या किनारी भागांत सीरियन सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले असून, असद समर्थक अलावाइट्स समुदायाला लक्ष्य केले जात आहे.

745 नागरिकांसह 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू

ब्रिटनस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स (SOHR) संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या दोन दिवसांतील हल्ल्यांमध्ये किमान 745 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 125 सरकारी सुरक्षा दलांचे जवान आणि 148 असद समर्थक मारले गेले आहेत. लताकिया शहराच्या आसपास वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असून, या भागात मोठ्या संख्येने अलावाइट्स समुदायाचे लोक राहतात.

हे देखील वाचा : तिबेटी उठाव दिन केवळ एक ऐतिहासिक घटना नसून स्वातंत्र्याच्या संघर्षाची आठवण आहे

अत्याचाराच्या भीषण घटना

या हिंसाचारात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांनी संपूर्ण जग हादरले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अलावाइट महिलांची नग्न परेड काढण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. एवढेच नाही, तर एका लहान मुलाला रायफल देऊन त्याच्याच कुटुंबातील सदस्यांना गोळ्या घालण्यास भाग पाडण्यात आल्याचे हृदय पिळवटून टाकणारे वृत्त समोर आले आहे.

‘रस्त्यावर उभं राहून गोळी झाडली’

लताकिया भागात सुरू झालेला हिंसाचार अचानक वाढला, जेव्हा असद समर्थक सैनिकांनी सीरियन सुरक्षा दलांवर हल्ला केला. हा भाग असद समर्थक अलावाइट अल्पसंख्याकांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यानंतर, सीरियन सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर अलावाइट नागरिकांची कत्तल सुरू केली. बनियास शहरातील एका प्रत्यक्षदर्शीने स्काय न्यूजला सांगितले, “सुरक्षा दलांनी लोकांना जबरदस्तीने रस्त्यावर उभे केले आणि नंतर त्यांच्यावर बेधडक गोळीबार केला.” यामध्ये कोणालाही सोडण्यात आले नाही. एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, त्याच्या 20 शेजाऱ्यांना निर्दयपणे ठार मारण्यात आले.

सामूहिक कबरीत मृतदेह दफन

हिंसाचार एवढ्या टोकाला गेला आहे की, मृतदेह पुरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक कबरी खणण्यात आल्या आहेत. वेधशाळेचे प्रमुख रामी अब्दुररहमान यांनी सांगितले की, शनिवारी रात्रीपर्यंत हिंसाचाराच्या घटना काहीशा मंदावल्या होत्या, पण तोपर्यंत शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. सीरियन राज्य वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, किनारपट्टी भागातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले असून, सरकारी सैन्याने असद समर्थकांच्या ताब्यात असलेल्या बहुतांश भागांवर ताबा मिळवला आहे.

हे देखील वाचा : सीरियात पुन्हा गृहयुद्धाचा भडका; 70 जणांचा मृत्यू, लताकियामध्ये भीषण चकमक

सत्तांतरानंतरही देश अस्थिर

अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखालील HTS गटाने डिसेंबर 2023 मध्ये बशर अल-असद यांना सत्तेवरून हटवले होते. त्यानंतर, असद यांनी रशियात आश्रय घेतला असून, त्यांचे समर्थक अजूनही सीरियात कार्यरत आहेत. नवीन सरकारने असद समर्थकांना सुरक्षा दलांवरील हल्ल्यांसाठी जबाबदार धरले आहे. सीरियात 2011 पासून सुरू असलेल्या गृहयुद्धात पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, लाखो लोक बेघर झाले आहेत. आता पुन्हा एकदा सुरू झालेल्या हिंसाचारामुळे सीरियातील जनतेवर आणखी संकट कोसळले आहे.

Web Title: Over a thousand dead as syrias interim government attacks assad supporters in latakia and tartus nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 10:09 AM

Topics:  

  • Syria
  • syria news
  • World news

संबंधित बातम्या

World War 3: अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ठिणगी! ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे चोख प्रत्युत्तर
1

World War 3: अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ठिणगी! ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे चोख प्रत्युत्तर

Border Tension: ‘ड्रोन तर वाचलं, पण तुमचं काय?’ पाकिस्तानच्या नापाक कृत्यांनंतर भारतीय लष्कराचा संतापजनक इशारा
2

Border Tension: ‘ड्रोन तर वाचलं, पण तुमचं काय?’ पाकिस्तानच्या नापाक कृत्यांनंतर भारतीय लष्कराचा संतापजनक इशारा

Antonov An 26: रशियन लष्करी विमानाचा मोठा अपघात! क्रिमियामध्ये विमान एका कड्यावर कोसळले; विमानातील 29 जणांचा मृत्यू
3

Antonov An 26: रशियन लष्करी विमानाचा मोठा अपघात! क्रिमियामध्ये विमान एका कड्यावर कोसळले; विमानातील 29 जणांचा मृत्यू

Iran चा सुप्रीम नेता Mojtaba Khamenei आहे कुठे? रशियाच्या राजदुताने उलगडले रहस्य, Donald Trump ला बसणार धक्का
4

Iran चा सुप्रीम नेता Mojtaba Khamenei आहे कुठे? रशियाच्या राजदुताने उलगडले रहस्य, Donald Trump ला बसणार धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.