Pahalgam Terror Attack Will Pakistan suspends 1972 Shimla Agreement that upholds LOC sanctity
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळावरी (22 एप्रिल) पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यांत 26 जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याना भारतात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा म्हणजे द रेझिस्टंट्स फ्रंट’ (TRF) ने घेतली आहे. सध्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान आणि भारतमधील संबंध चिघळले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधी मोठी कारवाई करत अनेक मोठे निर्णय घेतले आहे.
सध्या पाकिस्तान देखील भारताच्या या निर्णयांना प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान काही तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे की, पाकिस्तान 1972 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात पाकिस्तान-भारतमध्ये झालेला शिमला करार रद्द होण्याची शक्यता आहे. हा करारा नेमका काय होता आणि हा करारा रद्द झाल्यास काय परिणाम होतील हे आपण जाणून घेऊयात.
1972 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये शिमला करार करण्यात आला होता. हा करारा दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि युद्धोत्तर स्थिती हातळण्यासाठी झाला होता. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी जुलै 1972 मध्ये हिमाचल प्रदेशातील शिमला येथे या करारावर स्वाक्षरी केली होती. यामुळे या कराराला शिमला करार नाव देण्यात आले होते. तसेच या करारातूनच बांगलादेशची निर्मिती झाली होती.
सध्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत संतप्त झाल आहे. भारताने हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. भारताने पाकिस्तानला धडा शिकवम्यासाठी सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद करण्यात आली आहे. याशिवाय भारतातील पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोजून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पाकिस्तानींसाठी व्हिसा बंदी लागू केली आहे. आणि पाकिस्तानसोबत असलेले राजनैतिक संबंध देखील कमी करत लष्करी अधिकाऱ्यांना हद्दपार केले आहे.
या कारवाईचा परिणाम म्हणून पाकिस्तान भारत-शिमला करारा रद्द करण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. यामुळे दोन्ही देशांतील शांततेचा आणि संवादाचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. नियंत्रण रेषेवरील (LoC) परिस्थिती बिघडून लष्करी कारवाया वाढण्याची शक्यता आहे. तसेच हा करारा बांगलादेशच्या अस्तित्वाला अप्रत्यक्षपणे मान्यता देतो, परंतु हा करारा रद्द झाल्यास वादाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध शक्यता वर्तवली जात आहे.