Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Afghan War : कराची हल्ल्यानंतर पाकिस्तानचा पलटवार; अफगाण सीमेवर मध्यरात्री मोठी लष्करी कारवाई, २० हून अधिक ठार

Pak-Afghan War Update : पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये सतत हल्ले सुरु असून कराचीवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमेलगत मोठी कारवाई केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 29, 2026 | 09:55 AM
Pak-Afghan War

Pak-Afghan War

Follow Us
Follow Us:
  • कराची हल्ल्यानंतर पाकिस्तानचा पलटवार
  • अफगाण सीमेवर मध्यरात्री मोठी लष्करी कारवाई
  • २० हून अधिक ठार
Pak-Afghan War News in Marathi : इस्लामाबाद/काबूल : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे.  पाकिस्तानने कराचीवर झालेल्या हल्ल्यानंतर रविवारी (२८ जून) मध्यरात्री उशिरा अफगाण सीमेवर लष्करी मोहिम राबवली. या कारवाईत २० जण ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तान सरकारने ही कारवाई नुकत्याच झालेल्या कारचीवरील हल्ल्याला थेट उत्तर असल्याचे म्हटले.

US Iran Conflict : युद्धाचा धोका टळला? अमेरिका आणि इराण हल्ले थांबवण्यास तयार; कतारमध्ये ‘होर्मुझ’बाबत होणार महत्त्वाची बैठक

पाकिस्तानचे माहितीमंत्री अत्ताउल्ला तरार यांनी माध्यमांशी संवाद साधताना, त्यांच्या सैन्याने ही गुप्त कारवाई केल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाक-अफगाण सीमावर्ती भागांत काही ठिकणांना लक्ष्य करण्यात आले आहे. या ठिकाणी पाकिस्तानविरोधी कट रचला जात होता, असा दावा तरार यांनी केला. पण या लष्करी मोहिमेमुळे सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाकिस्तानच्या कराचीवर हल्ला

शनिवारी (२७ जून) रात्री पाकिस्तानच्या कराची येथील गुलिस्तान-ए-जौहर परिसरात सिंध रेंजर्सच्या प्रादेशिक मुख्यालयावर हल्ला करण्यात आला होता.  मुख्यालयावर स्फोटकांनी भरलेले वाहन प्रवेशद्वाराजवळ आदळवण्यात आले आणि त्यानंतर गोळीबारही करण्यात आला होता. या हल्ल्यात पाकिस्तान रेंजर्सचे ३ जवान ठार झाले होते. तर अनेक हल्लेखोरांनाही ठार केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.

पाकिस्तानचे थेट प्रत्युत्तर

या हल्ल्यानंतर पाकिस्तानने रविवारी (२८ जून) मध्यरात्री अफगाण सीमेलगत हल्ले केले. पाकिस्तानने ही कारवाई कराचीसह देशांच्या इतर भागांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना उत्तर असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान, आणि कराची हल्ल्यांमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात येत होते. अफगाण सीमेवरुन या हल्ल्यांचे नियोजन होत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.

सध्या या कारवाईवर अफगाणिस्तानकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दोन्ही देशांतील हा वाद काही नवीन नाही. गेल्या अनेक दशकांपासून सीमावाद आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरुन अफगाण पाकिस्तानमध्ये तणावाचे संबंध राहिले आहेत. या नव्या लष्करी कारवाईमुळे मात्र परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमका वाद ?

पाकिस्तानचा आरो आहे की, अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान यांसारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय दिला जात आहे. या संघटनांकडून पाकिस्तानवर हल्ले केले जात असल्याचा आरोप आहे. तर अफगाणिस्तानने हा आरोप फेटाळला असून पाकिस्तानचे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आहे. दोन्ही देशांमध्ये दुरंड सीमारेषेवरुनही जुना वाद आहे. अफगाणिस्तानने या सीमेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता दिलेली नाही.

Venezuela Earthquake : मलब्यात अडकले जीव, सरकारी अधिकारी मात्र सेल्फी काढण्यात मग्न? धक्कादायक दाव्यामुळे खळबळ

Web Title: Pak afghan war pakistan military operation afghan border karachi attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • Afghanistan
  • Afghanistan-Pakistan Conflict
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

US Iran Conflict : युद्धाचा धोका टळला? अमेरिका आणि इराण हल्ले थांबवण्यास तयार; कतारमध्ये ‘होर्मुझ’बाबत होणार महत्त्वाची बैठक
1

US Iran Conflict : युद्धाचा धोका टळला? अमेरिका आणि इराण हल्ले थांबवण्यास तयार; कतारमध्ये ‘होर्मुझ’बाबत होणार महत्त्वाची बैठक

Venezuela Crisis: 10 हजार मृत्यू आणि जगातील सर्वात मोठ्या तेल विहिरींना तडे; व्हेनेझुएलातील विध्वंसामुळे सर्वच देशांचे मोठे नुकसान
2

Venezuela Crisis: 10 हजार मृत्यू आणि जगातील सर्वात मोठ्या तेल विहिरींना तडे; व्हेनेझुएलातील विध्वंसामुळे सर्वच देशांचे मोठे नुकसान

PM Modi: सेशेल्सने पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मानाने गौरवले; पाहा काय आहे ‘Guardian Of The Blue Horizon’ पुरस्कार?
3

PM Modi: सेशेल्सने पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मानाने गौरवले; पाहा काय आहे ‘Guardian Of The Blue Horizon’ पुरस्कार?

पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान! ‘हिंद महासागराला संधींचा महासागर बनवणार’, पीएम मोदींचा मोठा संदेश
4

पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान! ‘हिंद महासागराला संधींचा महासागर बनवणार’, पीएम मोदींचा मोठा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.