Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Baloch Conflict : बलुचिस्तान पुन्हा पेटलं! BLA ने पाकिस्तानी सैन्याच्या बसला स्फोटकांनी उडवलं; ४५ जवान ठार झाल्याचा दावा

Pak-Baloch Conflict : पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील BLA संघटनेत पुन्हा संघर्ष पेटालआहे. BLA ने पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला केला असून ४५ जवान ठार झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या PoK मध्येही आंदोलनामुळे तणावपूर्ण परिस्थिती आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2026 | 10:01 AM
PaK Baloch Conflict

PaK Baloch Conflict

Follow Us
Follow Us:
  • बलुचिस्तानमध्ये पाक सैन्यावर BLA चा घातक हल्ला
  • ४५ जवान ठार झाल्याचा दावा
  • सैन्याची बस स्फोटकांनी दिली उडवून
Pak-Baloch Conflict News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत संघर्षाचा भडका उडाला आहे. एकीकडे PoK मध्ये तणावपूर्ण परिस्थितीत असताना बलुचिस्तानमध्ये पुन्हा मोठा हल्ला झाला आहे. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने पाकिस्तानी सैन्यांच्या बसला स्फोटकांनी उडवून दिले आहे. या हल्ल्यात ४५ जवान ठार झाल्याचा दावाही BLA ने केला आहे. परंतु अद्याप पाकिस्तानी लष्करी किंवा सरकारकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

हे देखील वाचा : US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध भडकलं! बाल रुग्णालयावर बॉम्बहल्ल्याचा तेहरानचा मोठा दावा

BLA ने जारी केल्ल्या निवेदनानुसार, संघटनेच्या फतेह स्क्वाडने हा हल्ला केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या बसला शक्तिशाली स्फोटांनी उडवून देण्यात आले. तसेच घटनास्थळावरील अतिरिक्त पाक सुरक्षा दलांवरही हल्ला करण्यात आल्याचा दावा केला. या गोळीबारात अनेक सैनिक जखमी झाले असून मृतांची संख्या वाढू शकते असे BLA ने म्हटले.

बलुचिस्तानमधील अंतर्गत संघर्ष

बलुचिस्तानमध्ये सरकारविरोधात लोकांनी बंड पुकारला आहे. बलुच फुटीरतावादी गटांनी सरकारवर बलुचिस्तानमधील नैसर्गिक व खनिज साधनंपत्तीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. याचा स्थानिकांना कोणताही लाभ मिळत नसल्याचे बलुच लिबरेशन आर्मीने म्हटले. यामुळेच बलुचिस्तानमधील संघटना पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी  करत आहे. दुसरीकडे पाकिस्तान सरकारने BLA ला दहशवादी संघटना मानले आहे.

PoK मध्येही सरकारविरोधात आंदोलन

दुसरीकडे पाकिस्तानच्या ताब्यातील PoK मध्येही सरकारविरोधी आंदोलन सुरु आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय प्रतिनिधित्व, निवडणुकांमधील राखीव जागा, महागाई, अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा, सरकारच्या धोरणांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष वाढत आहे. पीओकेच्या स्वातंत्र्याचीही मागणी केली जात आहे.

अशा परिस्थितीत बलुचिस्तानमधील हल्ल्यांमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्करासमोर मोठे आव्हान उभे आहे. परंतु अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. नुकत्याच झालेल्या हल्ल्याबाबतही पाकिस्तान सरकारन मौन असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक प्रश्न आणि बलुचिस्तानमधील हल्ले जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहेत. पाक सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थिक केले जात आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष्य पाकिस्तानकडे लागले आहे.

हे देखील वाचा :  Canada Wildfire : कॅनडात वणव्याचा भीषण कहर! आगीच्या विळख्यात ट्रेन सापडली अन्…, थरारक दृश्यांचे VIDEO समोर

Web Title: Pak baloch conflict bla claims attack on pakistan army bus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Indus Water Treaty : सिंधू जलसंधीबाबत हेगच्या निर्णयाचे पाकिस्तानकडून स्वागत; भारताने निर्णय फेटाळला
1

Indus Water Treaty : सिंधू जलसंधीबाबत हेगच्या निर्णयाचे पाकिस्तानकडून स्वागत; भारताने निर्णय फेटाळला

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
2

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
3

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
4

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.