Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan: पाकिस्तानात पुन्हा अन्नाची आणीबाणी? गव्हाच्या सरकारी खरेदीत मोठा घोळ; 140 रुपये किलोने पीठ खरेदी करण्यास जनता मजबूर

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील गहू खरेदी योजना सपशेल अयशस्वी ठरली आहे. १० लाख मेट्रिक टनच्या उद्दिष्टाच्या तुलनेत, सरकारला केवळ ७९,८३५ टन गहू खरेदी करता आला. यामुळे गहू आणि पिठाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 06, 2026 | 12:45 PM
pakistan flour crisis sindh government wheat procurement fails prices hit 140 rupees

pakistan flour crisis sindh government wheat procurement fails prices hit 140 rupees

Follow Us
Follow Us:
  • सरकारी योजना कोलमडली
  • पिठाचे भाव गगनाला
  • शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

Sindh government wheat procurement failure : आधीच आर्थिक गर्तेत सापडलेल्या शेजारील देश पाकिस्तानसमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. आता पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून एक अत्यंत चिंताजनक वृत्त समोर आले आहे. येथील प्रांतीय सरकारची चालू हंगामातील गहू खरेदी योजना पूर्णपणे कोलमडून पडली आहे. याचा थेट फटका पाकिस्तानच्या सर्वसामान्य आणि गरीब जनतेला बसत असून, बाजारात गहू आणि पिठाचे दर कल्पनेपलीकडे वाढले आहेत. सरकारी अन्न विभाग धान्य साठा करण्यात अपयशी ठरल्यामुळे बाजारात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे लोकांना आता दुप्पट दराने पीठ खरेदी करावे लागत आहे.

१० लाखांचे उद्दिष्ट, पण खरेदी फक्त ८० हजार टन!

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने (Dawn) दिलेल्या अधिकृत वृत्तानुसार, सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांनी या वाढत्या महागाईवर आणि अन्न संकटावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी तातडीची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांनी जे आकडे सादर केले, ते पाहून मुख्यमंत्र्यांचेही डोके चक्रावले. सरकारने या हंगामात १० लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु, ४ जूनपर्यंत अन्न विभागाला केवळ ७९,८३५.६६ मेट्रिक टन गहू खरेदी करता आला. म्हणजेच सरकार आपले केवळ ८ टक्के उद्दिष्टही पूर्ण करू शकलेले नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine War: पुतिन यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळताच युक्रेनचा थरकाप उडवणारा प्रहार; अझोव समुद्रात रशियाची 5 जहाजे उडवली

शेतकऱ्यांनी सरकारी केंद्रांकडे का फिरवली पाठ?

सरकारी खरेदी मोहीम अक्षरशः उद्ध्वस्त होण्यामागे मुख्य कारण म्हणजे सरकारी दरांमधील तफावत. सरकारने २०२५-२६ च्या पिकासाठी १ एप्रिल रोजी खरेदी मोहीम सुरू केली होती. यादरम्यान सुमारे ३.३२ लाख शेतकऱ्यांना फायदा पोहोचवण्यासाठी ४० किलो गव्हामागे ३,५०० पाकिस्तानी रुपये आधारभूत किंमत (Support Price) जाहीर करण्यात आली होती. तसेच गोण्यांसाठी स्वतंत्र पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, खुल्या बाजारात (Open Market) खाजगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना या सरकारी दरापेक्षा खूप जास्त भाव दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल सरकारी गोदामांमध्ये नेण्याऐवजी थेट खाजगी व्यापाऱ्यांना रोख पैशात विकून टाकला.

Karachi residents are paying the highest flour prices in Pakistan, with a 20kg flour bag reaching Rs. 2,800, according to official statistics. The continued rise in flour prices is adding to household expenses amid ongoing inflationary pressures across the country. Subscribe… pic.twitter.com/VweqZZpMxn — Narratives Media (@NarrativesM) June 6, 2026

credit – social media and Twitter

साठेबाजी आणि कृत्रिम टंचाईचा बाजार

सरकारी खरेदीत झालेली ही मोठी घट आणि व्यापाऱ्यांनी केलेली गव्हाची साठेबाजी यामुळे खुल्या बाजारात गव्हाच्या दरात अचानक २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या कराचीमध्ये १०० किलो गव्हाचा भाव ११,१०० पाकिस्तानी रुपयांवर पोहोचला आहे, तर हैदराबादमध्ये हाच दर १०,९०० रुपये प्रति १०० किलो झाला आहे. बाजारात गव्हाची उपलब्धता कमी झाल्याचा थेट फायदा आता पिठाच्या गिरण्या आणि मोठे व्यापारी घेत आहेत. त्यांनी गव्हाचा साठा करून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे, जेणेकरून भविष्यात अजून जास्त नफा कमवता येईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dubai Royal Family: दुबईचे राजघराणे बनले सोन्याचा पिंजरा; का पळून जात आहेत राजकन्या आणि राण्या? सुनेच्या अटकेने खळबळ

अधिकृत दर कागदावरच; जनता महागाईच्या खाईत

सिंध सरकारने किरकोळ बाजारात पिठाचा अधिकृत भाव १०७ रुपये प्रति किलो निश्चित केला होता. परंतु, प्रत्यक्षात कोणत्याही दुकानात या भावाने पीठ मिळत नाहीये. सर्वसामान्य नागरिकांना १ किलो पिठासाठी १३५ ते १४० पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत. आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी साठेबाजांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आणि बाजारावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, जोपर्यंत सरकारकडे स्वतःचा गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत बाजारातील किमतींवर नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या अन्न संकटामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा अराजकतेची स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Pakistan flour crisis sindh government wheat procurement fails prices hit 140 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Government
  • Pakistan News
  • Wheat Prices

संबंधित बातम्या

Vladimir Putin : ‘तो एक मोठा देश…’ , भारतानंतर पाकिस्तानवरही पुतिनकडून कौतुकांचा वर्षाव; भारत-चीन संबंधावरही भाष्य
1

Vladimir Putin : ‘तो एक मोठा देश…’ , भारतानंतर पाकिस्तानवरही पुतिनकडून कौतुकांचा वर्षाव; भारत-चीन संबंधावरही भाष्य

Ishaq Dar: इशाक दार यांनी अमेरिकेत जाऊन इराणच्या अणुकार्यक्रमाची गुपिते केली उघड? पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
2

Ishaq Dar: इशाक दार यांनी अमेरिकेत जाऊन इराणच्या अणुकार्यक्रमाची गुपिते केली उघड? पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान
3

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान

Cotton Import Duty : आता कपडे होणार स्वस्त! टेक्स्टाईल उद्योगासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4

Cotton Import Duty : आता कपडे होणार स्वस्त! टेक्स्टाईल उद्योगासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.