Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hinglaj Mata: श्रद्धेचा अविश्वसनीय प्रवास! पाकिस्तानामध्ये दुमदुमला ‘जय माता दी’चा जयघोष; 3 लाख भाविकांनी घेतले दर्शन

Hinglaj Mata Yatra Pakistan 2026 : बलुचिस्तानच्या ऐतिहासिक हिंगलाज माता मंदिराचा तीन दिवसीय वार्षिक उत्सव संपन्न झाला. दुर्गम डोंगराळ प्रदेश असूनही, तीन लाखांहून अधिक भाविकांनी मातेला वंदन केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 20, 2026 | 03:30 PM
pakistan hinglaj mata yatra 2026 balochistan hindu pilgrimage 3 lakh devotees

pakistan hinglaj mata yatra 2026 balochistan hindu pilgrimage 3 lakh devotees

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानात भक्तीचा पूर
  • दुर्गम प्रवासाची जिद्द
  • अल्पसंख्याक हिंदूंची सांस्कृतिक ओळख

Hinglaj Mata Yatra Pakistan 2026 : पाकिस्तान (Pakistan) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर केवळ नकारात्मक बातम्या येतात, पण याच पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून एक अशी बातमी समोर आली आहे जी माणुसकी आणि श्रद्धेचा विजय सांगते. हिंगोल नदीच्या काठावर वसलेल्या आणि ५१ शक्तीपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘श्री हिंगलाज माता’ मंदिरात नुकताच तीन दिवसीय वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. १७ एप्रिल रोजी सुरू झालेला हा सोहळा रविवारी संपन्न झाला आणि या तीन दिवसांत संपूर्ण बलुचिस्तान भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते.

पाकिस्तानातील हिंदूंचे सर्वात मोठे शक्तिपीठ

हिंगलाज माता मंदिर हे दक्षिण आशियातील सर्वात महत्त्वाच्या हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार, जेव्हा माता सतीने आत्मदहन केले, तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्यांच्या पार्थिवाचे तुकडे केले. त्यातील सतीचे ‘ब्रह्मरंध्र’ या ठिकाणी पडले होते, अशी हिंदू भाविकांची गाढ श्रद्धा आहे. हे मंदिर एका नैसर्गिक गुहेत असून आजूबाजूला हिंगोल राष्ट्रीय उद्यानाचा विस्तीर्ण आणि दुर्गम डोंगराळ भाग आहे. तरीही, आईच्या दर्शनाची ओढ भाविकांना या कठीण वाटेवरून खेचून आणते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sankalp: होर्मुझमध्ये Indian Navy ‘हाय अलर्टवर’! 7 युद्धनौका समुद्रात उतरवल्या; नौदलाने जारी केली ‘अशी’ नवीन नियमावली

२० दिवसांचा पायी प्रवास आणि अढळ श्रद्धा

या यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भाविकांची जिद्द. सिंध प्रांतातील थारपारकर, उमरकोट आणि संघार यांसारख्या दुर्गम भागांतून हजारो हिंदू बांधव अनवाणी पायांनी चालत या मंदिरात पोहोचले. काहींनी हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल २० दिवस सतत पायपीट केली. कडाक्याचे ऊन आणि वाळवंटी प्रदेश असतानाही मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण ‘हिंगलाज माता की जय’ म्हणत पुढे सरकत होता. या प्रवासादरम्यान भाविकांची सेवा करण्यासाठी ‘श्री हिंगलाज माता कल्याण मंडळा’ने २४ तास अन्न, पाणी आणि औषधांची सोय केली होती.

Hinglaj Mata Mandir Festival: Third Largest Hindu Gathering After India and Nepal, 300,000 Pilgrims Attend The annual Hinglaj Mata Mandir festival, (17’18’19’April)held in the rugged mountains of Balochistan, has emerged as a powerful symbol of religious harmony and tolerance… pic.twitter.com/QnkfqpIpZO — Senator Danesh Kumar Palyani (@palyani) April 19, 2026

credit – social media and Twitter

एकात्मतेचे दर्शन आणि व्यापक व्यवस्था

या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ हिंदूच नव्हे, तर स्थानिक मुस्लिम समुदाय आणि काही राजकीय नेतेही या धार्मिक विधींमध्ये सहभागी झाले होते. बलुचिस्तान प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (PDMA) यात्रेकरूंसाठी कडक सुरक्षा व्यवस्था आणि सोयी-सुविधा पुरवल्या होत्या. पाकिस्तानमध्ये सुमारे ५० लाख हिंदू राहतात, जे एकूण लोकसंख्येच्या २ टक्क्यांहून अधिक आहेत. त्यांच्यासाठी हिंगलाज यात्रा ही केवळ एक धार्मिक विधी नसून त्यांची सांस्कृतिक मुळे जिवंत ठेवण्याचे एक मोठे माध्यम आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ajit Doval : भारताचे ‘चाणक्य’ मैदानात! अजित डोवाल यांचा तातडीचा सौदी दौरा; युद्ध पेटण्यापूर्वी भारताचा मोठा प्लॅन तयार

श्रद्धेचे केंद्र: हिंगोल नदीचा काठ

हिंगलाज माता मंदिर हे निसर्गरम्य हिंगोल नदीच्या किनाऱ्यावर आहे. या यात्रेमुळे परिसरातील अर्थव्यवस्थेलाही गती मिळते. वर्षभरात येथे १० लाखांहून अधिक लोक भेटी देतात, परंतु या तीन दिवसांच्या मुख्य उत्सवात भाविकांचा ओघ नियंत्रित करणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान असते. यावर्षी ३ लाख भाविकांनी शांततेत दर्शन घेतल्याने प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पाकिस्तानमधील हिंदूंच्या हक्कांचे आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे हे एक बोलके उदाहरण ठरले आहे.

Web Title: Pakistan hinglaj mata yatra 2026 balochistan hindu pilgrimage 3 lakh devotees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Goddess Durga
  • hindu religion
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा
2

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा

Pakistan Earthquake: व्हेनेझुएलाच्या भयानक भूकंपानंतर आता पाकिस्तानलाही हादरा, डेरा गाझी खानजवळ तीव्र झटका
3

Pakistan Earthquake: व्हेनेझुएलाच्या भयानक भूकंपानंतर आता पाकिस्तानलाही हादरा, डेरा गाझी खानजवळ तीव्र झटका

Shani Pradosh Vrat: शनिच्या साडेसातीमुळे त्रस्त आहात का? जाणून घ्या शनि प्रदोष व्रताची कथा
4

Shani Pradosh Vrat: शनिच्या साडेसातीमुळे त्रस्त आहात का? जाणून घ्या शनि प्रदोष व्रताची कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.