
pakistan today's protest against shehbaz sharif
सध्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेरही मोर्चा सुरु केला आहे. यामध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ(Shehbaz Sharif) , बिलावल भुट्टो, आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याविरोधात नारेबाजी केली जात आहे. तसेच इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी केली जात आहे. त्यांच्या जिवंत असण्याचा पुरावा मागितला जात आहे.
सरकारने सुरक्षेच्या कारणास्तवर रावळपिंडीत १४४ कलम लागू केले होते, मात्र या निर्णयाचा काहीही फायदा झाला नाही. सध्या रावळपिंडीत आणि इतर काही भागात बिकट अस्थिरता निर्माण झाली आहे. पीटीआय पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, इम्रान खान यांना खोट्या आरोपांखाली तुरुंगात टाकण्यात आले आहेत.
तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही त्यांच्या कुटुंबाना आणि जवळच्या व्यक्तींना भेटून दिले जात नाही. तुरुंग प्रशासन न्यायालयाचे नव्हे, लष्कराचे सुचनांचे पालन करत आहे. गेल्या आठवड्यात आठ वेळा इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे सध्या परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात देखील मोठा गोंधळ सुरु आहे.
सध्या परिस्थिती गुंतागुंतीची होत आहे. मात्र तुरुंग प्रशासना पीटीआयचे सर्व आरोप फेटाळले आहे. तुरुंग प्रशासनाने न्यायालयाच्या सर्व सुचनांचे पालन होत असून इम्रान खान तुरुंगत सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या प्रकृती किंवा निधनाबाबतचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने पाकिस्तानमध्य अशांतता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत हिंसक निदर्शने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे असीम मुनीर देखील गोंधळात पडले आहे. त्यांना २९ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान लष्करप्रमुखाचे पद पुन्हा सोपवण्यात येणार होते. मात्र CDF वर पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या स्वाक्षरी महत्वाची आहे. पण याच वेळी शाहबाज लंजन दौऱ्यावर गेले होते. सध्या ते लंडनहून परतले आहे परंतु इस्लामाबादला पोहोचलेले नाहीत. माध्यमांमध्ये, पंतप्रधान शाहबाज शरीफ असीम मुनीर यांना शक्तीशाली पद देऊ इच्छित नसल्याने या प्रक्रियेपासून स्वत:ला दूर ठेवत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे सध्या मुनीरची पंचायकत झाली आहे.
पाकिस्तानने गाठला निर्लज्जपणाचा कळस; मदत म्हणून श्रीलंकेला पाठवले शिळे अन् खराब अन्न