
Minister of Defence of Pakistan Asif Khwaja
Pakistan on Tejas Crash : इस्लामाबाद : दुबई एअर शो 2025 दरम्यान भारताच्या हवाई दलाचे लढाऊ विमान तेजस कोसळले. शेवटच्या दिवशी हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे भारताच्या हवाई दलाला (Indian Air Force) मोठा धक्का बसला आहे. या अपघातात पायलट विंग कमांडर नयांश स्याल यांचा दु:खद मृत्यू झाला. दरम्यान या अपघातावर आणि पायलटच्या मृत्यूवर पाकिस्तानची (Pakistan) पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली आहे. पाकिस्तानने पायलट नमांश स्याल यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
‘Tejas’ क्रॅशवर पाक पत्रकाराला खिदळणं पडलं महागात; भारतीयांनी अशी जिरवली की…, VIDEO
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांच्या मृत्यूवर, त्यांच्या कुटुंबाप्रती आणि भारतीय हवाई दलाबदल्ल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष केवळ युद्धपातळीवर आहे, मानवतेच्या पातळीवर आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “आम्ही केवळ आकाशतल्या लढाईमध्ये स्पर्धक आहोत, मानवी पातळीवर नाही.”
याच वेळी पाकिस्तान आणि त्याच्या मित्र देशांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तान स्ट्रॅटेजिक फोरमने अपघातावर शोक व्यक्त करत म्हटले आहे की, दुर्दैवाने पायलट विंग कमांडर नमांश स्याल विमानातून बाहेर पडू शकले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.
नमांश स्याल हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील नगरोटा बागवान तहसीलमधील पटियालकर गावचे रहिवासी होते. कमांडर अत्यंत शिस्तप्रिय आणि शांत होते. त्यांना लहानपणापासूनच देशाची सेवा करण्याची इच्छा होती. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण सुजानपूर तिराच्या सैनिक शाळेत पूर्ण केले. ही शाळा भारतीय सैन्य आणि हवाई दलासाठी अनेक उत्कृष्ट अधिकारी निर्माण करण्यासाठी ओळखली जाते. बालपणापासूनच त्यांनी अभ्यास आणि खेळ दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. शालेय जीवनात असतानाच त्यांनी भारतीय हवाई दलात भरती होण्यावर लक्ष केंद्रित केले होते.
२४ डिसेंबर २००९ रोजी त्यांना भारतीय हवाई दलात नियुक्त करण्यात आले आणि इथूनच त्यांचे खरे उड्डाण सुरू झाले. नुकतेच त्यांच्याकडे दुबई एअर शोमध्ये भारताच्या स्वदेशी तेजस लढाऊ विमान सादर करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांना अनेक अत्याधुनिक आणि क्रिटिकल विमानांच्या विमान उड्डाणांचा अनुभव होता. त्यांनी आपली उत्कृष्ट लढाऊ वैमानिक म्हणून ओळख निर्माण केली होती. दुर्दैवाने दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमानाचा अपघात झाला, आणि भारताच्या हवाई दलाने एक उत्कृष्ट लढाऊ सैनिकाला गमावले. या घटनेने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
Ans: पाकिस्तानने तेजस लढाऊ विमान अपघात आणि अपघातात शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.
Ans: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांच्या मृत्यूवर, त्यांच्या कुटुंबाप्रती आणि भारतीय हवाई दलाबदल्ल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी भारताशी संघर्ष केवळ युद्धभूमीवर आहे, मानवतेच्या पातळीवर नाही, असेही ख्वाजा यांनी म्हटले,