Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Swat Blast: पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात शांतता मोर्चावर आत्मघाती हल्ला; पोलिसांना लक्ष्य करत स्फोट, 15 ठार अन् अनेक जखमी

Pakistan Swat Blast: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील स्वात जिल्ह्यात शांततेची मागणी करणाऱ्या निदर्शनांना लक्ष्य करून केलेल्या आत्मघाती हल्ल्यात पाच सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांसह १५ जण ठार झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 03, 2026 | 02:00 PM
pakistan swat kabal suicide blast peace rally marathi news

pakistan swat kabal suicide blast peace rally marathi news

Follow Us
Follow Us:
  • शांतता रॅलीवर फिदायीन हल्ला
  • सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १५ जणांचा मृत्यू
  • स्थानिक जनतेमध्ये तीव्र संताप

पाकिस्तानच्या (Pakistan) वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात पुन्हा एकदा भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. रविवारी, २ ऑगस्ट २०२६ रोजी स्वात जिल्ह्यातील काबल शहरात शांततेची मागणी करणाऱ्या आणि दहशतवादाचा निषेध करणाऱ्या एका भव्य रॅलीदरम्यान अचानक आत्मघाती स्फोट झाला. या भयंकर हल्ल्यात पाच पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल १५ जणांचा करुण अंत झाला, तर १२ हून अधिक नागरिक मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण स्वात खोऱ्यात प्रचंड घबराट, भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक रहिवासी आणि प्रादेशिक नागरिक संघटना असलेल्या ‘स्वात अमन जिरगा’ (Olasi Pasoon) द्वारे काबल शहरात या शांतता मार्चचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून स्वात खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये झालेली वाढ आणि सुरक्षेचा कोलमडलेला अक्षम्य खेळ याविरोधात शेकडो नागरिक हातात शांततेचे संदेश देणारे फलक आणि बॅनर घेऊन रस्त्यावर उतरले होते. आंदोलक जेव्हा काबल पोलीस ठाण्याच्या मुख्य चौकाजवळ पोहोचले आणि स्थानिक नेते अंतिम भाषण देत होते, त्याच वेळी एका संशयित फिदायीन (आत्मघाती) हल्लेखोराने स्वतःला स्फोटकांनी उडवून दिले.

काबल पोलीस ठाण्याजवळ रक्ताचा सडा अन् चित्कार

मलाकंद क्षेत्राच्या प्रादेशिक पोलीस अधिकाऱ्यांनी (RPO) दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचे मुख्य उद्दिष्ट रॅलीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस दल आणि बंदोबस्ताची सुरक्षा वलये भेदणे हेच होते. स्फोट इतका भीषण आणि शक्तिशाली होता की, त्याचा आवाज कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. क्षणार्धात संपूर्ण परिसरात धुराचे लोट, छिन्नभिन्न झालेले मृतदेह आणि जखमींचा आक्रोश पसरला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे लगतच्या इमारतींच्या काचा फुटल्या आणि रस्त्यावर पार्क केलेली वाहने उद्ध्वस्त झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bikini Atoll: जिथे अमेरिकेने टाकले 23 अणुबॉम्ब, तिथे 70 वर्षांनंतर उगवले निसर्गाचे वरदान; कॅन्सर करणार समूळ नष्ट?

प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, संशयित आत्मघाती हल्लेखोराने पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना चकवून गर्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या अंगावरील स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. या घटनेत घटनास्थळीच ५ पोलिसांचा आणि १० निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला.

रुग्णालयांमध्ये आणीबाणी, जखमींची प्रकृती चिंताजनक

स्फोटाची माहिती मिळताच पोलीस दल, लष्कराच्या तुकड्या आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. सुरक्षा दलांनी संपूर्ण काबल शहराला घेराव घालून नाकेबंदी लागू केली. गंभीर जखमी झालेल्या १२ हून अधिक जणांना स्थानिक रुग्णवाहिकांच्या मदतीने तात्काळ सैदू शरीफ सेंट्रल हॉस्पिटल आणि काबलच्या स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Footage shows blast victims hurried into a hospital in northwestern Pakistan, after a suicide bombing at a police station in Kabal near the Afghan border killed at least 14 people. Crowds of people had been protesting nearby when the bomb exploded. pic.twitter.com/M7OhAdDGd7 — Al Jazeera English (@AJEnglish) August 3, 2026

credit – social media and Twitter

रुग्णालय प्रशासनाने तात्काळ रेड अलर्ट जारी केला असून सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर बोलावण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुग्णालयाबाहेर जखमींच्या नातेवाईकांची मोठी गर्दी जमली असून तिथे अत्यंत हृदयद्रावक दृश्ये पाहायला मिळत आहेत.

जबाबदारी अद्याप अस्पष्ट, पण टीटीपीवर संशयाची सुई

या प्राणघातक आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी अद्याप अधिकृतपणे कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. परंतु, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील वाढता हिंसाचार आणि इतिहास पाहता या हल्ल्यामागे ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) चा हात असावा असा प्राथमिक संशय सुरक्षा यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. स्वात खोऱ्यात टीटीपीच्या वाढत्या प्रभावाविरोधात स्थानिक जनता गेल्या काही काळापासून सातत्याने रॅली काढून विरोध दर्शवत होती, ज्यामुळेच आंदोलकांना लक्ष्य करण्यात आले असावे असा अंदाज आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ceuta Crisis: स्पेनने सेउटा सीमेवर उभारली ‘तरंगती सागरी भिंत’; अवैध घुसखोरी रोखताना 72 स्थलांतरितांचा मृत्यू, युरोपमध्ये खळबळ

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त करत त्यांनी जखमींना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. यासोबतच दहशतवादाचा पूर्णपणे नायनाट करेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा दावाही सरकारकडून करण्यात आला आहे.

स्थानिक जनतेचा आक्रोश अन् सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

शांततेची आणि सुरक्षिततेची सनदशीर मार्गाने मागणी करणाऱ्या निःशस्त्र नागरिकांवरच असा भीषण हल्ला झाल्याने स्वात खोऱ्यातील जनतेमध्ये तीव्र संताप उफाळून आला आहे. एकेकाळी दहशतवादाच्या छायेतून मुक्त झालेल्या स्वातमध्ये पुन्हा एकदा तालिबानी सावट निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. “आमच्या मुलांना शिक्षण हवे आहे आणि आमच्या कुटुंबांना शांततेत जगायचे आहे; आम्ही पुन्हा रक्ताची होळी पाहू शकत नाही,” अशी आर्त हाक स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

पाकिस्तानच्या सुरक्षेचा दावा करणाऱ्या पोलिसांना आणि सैन्याला दहशतवादी थेट पोलीस ठाण्यांच्या समोर आव्हान देत असल्याने शाहबाज शरीफ सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि गुप्तचर यंत्रणांच्या अपयशावर आता तीव्र टीका होत आहे. प्रशासनाने परिसरात शोधमोहीम तीव्र केली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.b

Web Title: Pakistan swat kabal suicide blast peace rally marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Pakistan News
  • POK
  • PoK Elections
  • terror attack

संबंधित बातम्या

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा
1

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस
2

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस

Masood Azhar : FATF ची भीती की नवा डाव? 26/11 मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार मसूद अझरवर पाकिस्तानात 70 लाख रुपयांचे बक्षीस
3

Masood Azhar : FATF ची भीती की नवा डाव? 26/11 मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार मसूद अझरवर पाकिस्तानात 70 लाख रुपयांचे बक्षीस

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?
4

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.