
Pakistan Indonesia Deal
भारताकडून मार खाऊनही पाकिस्तान नफ्यात? JF-17 जेटवर आसिफ ख्वाजा यांनी केला ‘हा’ मोठा दावा
पाकिस्तान (Pakistan) आणि इंडोनेशियामध्ये (Indonesia) सध्या ४० JF-17 लढाऊ विमान आणि शाहपर किलर ड्रोन विकण्यासाठी संरक्षण कराराची चर्चा सुरु आहे. हा करार पाकिस्तानसाठी आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शिवाय इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी नुकतीच पाकिस्तानला भेट दिली होती. यावेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. यामुळे पाकिस्तानच्या संरक्षण उद्योगालाही चालना मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांचे सुरक्षा क्षेत्र मजबूत होईल. यामुळे पाकिस्तान आणि इंडोनेशियातील संरक्षण सहकार्य वाढेल.
याशिवाय इंडोनेशियाशी सुरु असलेल्या चर्चेत शाहपर ड्रोन्सचाही समावेश आहे. हे ड्रोन्स इंडोनेशियाच्या हवाई सैन्याची क्षमता वाढवतील. तसेच यामध्ये जुनियर, मिड-लेवल आणि सीनियर अधिकारी इंजिनीयर्सचा प्रदक्षिण देण्यासाठीही समावेश आहे. पाकिस्तानचे हे लढाऊ विमान मल्टी-रोल कॉम्बॅट क्षमतेचे आहे. यामध्ये हवाई संरक्षण, हल्ला आणि पाळत ठेवण्याची क्षमता आहे. यामुळे इंडोनेशियाच्या हवाई दलाची क्षमता वाढणार आहे.
दरम्यान याच वेळी आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे पाकिस्तानच्या JF-17 लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी चीन मदत करत आहे. तसेच यापूर्वी पाकिस्तानने म्यानमार, नायजेरिया, लीबिया. सौदी अरेबिया, अझरबैजान आणि बांगलादेश या देशांना JF-17 लढाऊ विमान विकले आहे. यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय संरक्षण बाजारात मोठा फायदा मिळत असल्याचे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी म्हटले आहे.
इंडोनेशिया आणि पाकिस्तानमधील संरक्षण करार हा भारतासाठी थेट धोका मानता येणार नाही. इंडोनेशियाचा हा भारताचा मित्र देश आहे. दोन्ही देशांमध्ये आधीपासूनच संरक्षण सहकार्य आहे. परंतु या डीलमुळे दक्षिण-पूर्व आशियामध्ये चीनचा प्रभाव वाढत आहे. कारण चीनच्या मदतीनेच पाकिस्तानला विमानांचे खरेदीदार भेट आहे. यामुळे धोरणात्मक पातळीवर ही बाब भारतासाठी धोक्याची मानली जात आहे.
इम्रान खान नव्हे, ईमान मजारी, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?
Ans: पाकिस्तानने इंडोनेशियासोबत JF-17 लढाऊ विमाने, आणि शाहपर किलर ड्रोनसाठी संरक्षण करार केला आहे.
Ans: पाकिस्तानने JF-17 लढाऊ विमाने म्यानमार, नायजेरिया, लीबिया. सौदी अरेबिया, अझरबैजान आणि बांगलादेश या देशांनी विकली आहेत.
Ans: पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरनंतरही लढाऊ विमानांसाठी मागणी मिळत आहे, ज्यामध्ये चीन पाकिस्तानची मदत करत आहे. यामुळे चीनचा दक्षिण-पूर्व आशियात प्रभाव वाढत आहे. हीबाब भारतासाठी धोकादायक असल्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.