Pakistan-Turkey News Pak Prime Minister Shahbaz Sharif Turkey visit
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सध्या चार देशांच्या विदेशी दौऱ्यावर आहे. शनिवारी (२४ मे) हा दौरा सुरु झाला आहे. या दरम्यान शाहबाज तुर्की, इराण, अझरबैजान आणि ताजिकिस्तानला भेट देणार आहेत.यावेळी त्यांनी रविवारी रात्री २५ मे रोजी इस्तंबूलमध्ये तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिर एर्दोगान यांची भेट घेतली यावेळी त्यांनी एर्दोगान यांच्या भारताविरूद्धच्या लढाईत पाकिस्तानला समर्थन दिल्याबद्दल आभार मानले.
तसेच दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. अध्यक्ष एर्दोगान यांनी तुर्की आणि पाकिस्तान दहशतवादाविरोधी एकत्र लढा देतील असे म्हटले. तसेच दोन्ही देश एकमेकांना लष्करी प्रशिक्षण, गुप्तच आणि तांत्रिक सहकार्य करपतील असेही एर्दोगान यांनी म्हटले. तुर्की आणि पाकिस्तानने ५ अब्ज डॉलर्सपर्यंत व्यापार वाढवण्यावर भर दिला. यासाठी ऊर्जा, वाहतक आणि संरक्षण क्षेत्रात सहाकर्य वाढवले जाईल असे दोन्ही देशांनी म्हटले.
दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये अद्यापही तणाव आहेच. यामुळे शाहबाज यांचा हा दौरा भारतासाठी चिंतेची बाब आहे. भारताशी लष्करी संबंधादरम्यान तुर्कीने ड्रोन, शस्त्रे पाकिस्तानला पुरवली होती. तसेच याचे प्रशिक्षण देण्यासाठी आपले लोक देखील पाठवले होते. तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी १७ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली होती. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचटे आश्वासन दिलो होते. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे भारताची यावर काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यापूर्वी भारताने तुर्कीला काश्मीर मुद्द्यावरुन फटकारले होते. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधीव अंतर्गत प्रश्न असून यामध्ये कोणत्याही बाह्य देशाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही असे भारताने म्हटले होते. परंतु पुन्हा एकदा एर्दोगान यांनी काश्मीर मुद्द्यात आपले नाक खुपसले आहे.
पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर मोहीम बारताने राबवली. या मोहीमेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत गेला. यादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दर्शवला होता.यामुळे तुर्कीला जगभारातून टीकांचा सामना करावा लागला होता. भारताने देखील तुर्कीवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु केली. एवढे होऊनही तुर्कीने पाकिस्तानची साथ सोडली नाही. उलट तुर्की आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
अशा परिस्थिती प्रश्न उपस्थित होतो की, तुर्की भारताऐवजी पाकिस्तानच्या बाजूने का उभा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तुर्की दक्षिण आशिया धोरणात व्यापारापेक्षा सुरक्षेला अधिक महत्व देते.
यामुळे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष यांनी पाकिस्तानला समर्थन दिले आणि आपले धोरण स्पष्ट केले. तुर्की आणि पाकिस्तानची पाश्चात्य देशांच्या सुरक्षा व्यवस्थेत भूमिका कमकुवत पडली आहे. यामुळे अशी परिस्थिती आपली भूमिका टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही देश एकमेकांच्या पाठीशी उभे आहेत, असे एर्दोगान यांनी त्यांच्या वर्तनातून दर्शवले आहे.
तसेच रशियासोबतच्या संरक्षण संबंध वाढवल्यानंतर नाटो देशांनी तुर्कीवर टिका केली होती. यावेळी तुर्की एकटा पडला होता. पाश्चात्य देशांमध्ये पाकिस्तानची परिस्थितीही तुर्की सारखीच आहे. पाकिस्तानची संरक्षण संस्था चीनच्या उद्योगांवर अवलंबून आहे. यामुळे कठीण परिस्थितीत तुर्की आणि पाकिस्तान एकमेकांसोबत आहे.
नाटोबाहेर पाकिस्तान हा तुर्कीचा सर्वाच मोठा भागीदारी देश आहे. यामुळे भारत नाराज आहे. तुर्कीने पाकिस्तान आणि भारतामदध्ये चांगले संबंध रहावेत यासाठी बराच काळ प्रयत्न केला आहे. २०१९ नंतर भारत आणि तुर्कीमधील संबंध अधिक बिघडले. काश्मीर मुद्द्यावर तुर्कीच्या मध्यस्थीने भारत सतापला होता. तुर्कीने वादग्रस्त विधान केले होते यामुळे संबंध अधिक चिघळले.
दरम्यान तुर्कीने आशियामध्ये आपले संरक्षण क्षेत्र वाढवण्यावर भर दिला आहे. यामद्ये पाकिस्तान तुर्कीचा मोठा भागीदार आहे. यामुळे दोन्ही देश आणखी सहकार्य वाढवण्यावर भर देत आहे.
तसेच तुर्की आणि पाकिस्तान दोन्ही इस्लामिक देश आहेत. पाकिस्तानचे सरकार आमि लष्कर नेहमीचट इस्लामाचा प्रचार करते. तसेच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान देखील इस्लामिक विचारसरमीला प्रोत्साहन देतात. यामुळेही दोन्ही देश सतत एकमेकांना पाठिंबा देत राहतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पुन्हा गोळीबाराने हादरली अमेरिका ; दक्षिण कॅरोलिनात ११ जण जखमी