पुन्हा गोळीबाराने हादरली अमेरिका ; दक्षिण कॅरोलिनात ११ जण जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुन्हा एकदा अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनात गोळीबारची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसर हादरलेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मीडिया रिपोर्टनुसार, या गोळीबारात ११ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये एक पोलिस कर्मचारी देखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
हॅरिएट काऊंटी च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. कॅरोलिनातील लिटिल रिव्हर येथे काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डझनभर रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना त्वरित रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
BREAKING: Shooting reported on Watson Avenue in Little River, South Carolina; reports of multiple victims. pic.twitter.com/9RV6gupnhE
— AZ Intel (@AZ_Intel_) May 26, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच हल्ल्यामागचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे. सध्या या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. परंतु अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी गोळीबार घडलेल्या ठिकाणच्या परिसराला वेढा घातला आहे. हल्लेखोरांनी पकडण्यासाठी हॅरिएट काऊटीचे पोलिस हाय अलर्ट मोडवर आहेत. लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षापासून सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा जानेवरीच्या सुरुवातीपासून २० हून अधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी येथील इस्रायली दूतावासाच्या कर्मचाऱ्यांवरही गोळबीरा करण्यात आला होता. यामध्ये दोन क्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली होती. हल्ल्यानंतर आरोपीने फ्री पॅलेस्टिनी च्या घोषणा दिल्या होती.
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाकडून न्यायाची मागमी केली होती. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आरोपीन गाझातील लोकांच्या हत्येमुळे त्याला दु:ख झाले. यामुळे त्याने संतप्त होऊन हल्ला केला असल्याचे म्हटले.
गेल्या काही महिन्यात गाझात इस्रायलच्या कारवाईमुळे गाझात हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच गाझातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहेत. गाझातील कारवाया थांबवण्याची इस्रायलकडे मागणी केली जात आहे.