
pakistan's asif khawaja big claims against india amid ceasefire with afghanistan
या सर्व घडमाडोंदरम्यान पाकिस्तानने भारतावर निशाणा साधला. तालिबान भारतासाठी पाकिस्तानविरोधात लढत असल्याचा दावा केला जाऊ लागला. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफा ख्वाज यांना हा दावा केला. त्यांनी हा दावा अशा वेळी केला जेव्हा अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर होते.
Pak-Afghan War : पाकिस्तानी सैन्य पॅन्ट सोडून गेले पळून ; अफगाणी सैन्यानी भरचौकात केला जल्लोष
आसिफ ख्वाजा यांनी दावा केला की, अफगाणिस्तान तालिबान भारतासाठी पाकिस्तानविरुद्ध लढत आहे. अफगाणिस्तानच्या पाकिस्तानमधील कारवायांमागे नवी दिल्लीचा हात असल्याचा आरोप आसिफा ख्वाजा यांनी केला. जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीदर्या त्यांनी म्हटले की, सध्या तालिबान भारतासाठी छुपे युद्ध लढत आहे. ख्वाजा यांनी तालिबानी परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या भारत भेटीचा उल्लेख करत यामागे भारताचा छुपा अजेंडा असल्याचे म्हटले.
त्यांनी म्हटले की, तालिबानच्या या भेटीतून त्यांच्यावरील हल्ल्यांमागे भारताचा थेट हात असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी दावा केला की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला शांतता हवी आहे. पण काही देश त्यांच्याती संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
बुधवारी (१५ ऑक्टोबर) पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांसाठी तात्पुरती युद्धबंदी लागू केल्याची घोषणा केली. याचा उद्देश दोन्ही देशांतील वादावर शांततेने तोडगा काढणे असल्याचे म्हटले.
तर तालिबान सरकारने जारी केलेल्या निवेदनात पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धबंदी होत असल्याचा दावा केला आणि सैन्याला दुसऱ्या बाजूने युद्धबंदीचे उल्लंघन होत नाही तोपर्यंत हल्ले थांबवण्याचे आदेश दिली.
प्रश्न १. अफगाणिस्तानकडून पराभवानंतर पाकिस्तानने भारतावर काय आरोप केले?
पाकिस्तानने अफगाणिस्तानकडून पराभवानंतर तालिबानच्या त्यांच्यावरील हलल्यात भारताचा थेट हात असल्याचा आरो केला.
प्रश्न २. भारतावर कोणी आरोप केले?
भारतावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी गंभीर आरोप केले.
प्रश्न ३. पाक-अफगाण मध्ये किती तासासांठी युद्धविराम लागू झाला आहे?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांसाठी युद्धबंदी लागू करण्यात आली आहे.