Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या सर्वोच्च धर्मगुरुंचा सरकारलाच घरचा आहेर; म्हणाले ‘भारत आपल्यापेक्षा खूप…’

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे बारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2025 | 07:20 PM
Pakistan's top religious leader says India Is Better Than us

Pakistan's top religious leader says India Is Better Than us

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे देशात संतापाचे वातावरण पसरले होते. पाकिस्तानविरोधात कारवाईची मागणी केली जात होती. दरम्यान भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई केली आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचे उच्चस्तरिय नेते आणि लष्करी अधिकारी भारताला वारंवार धमक्या देत आहे.

परंतु आता त्यांच्या देशातील लोकांनी त्यांची साथ सोडल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला. आता यानंतर पाकिस्तानचे सर्वाच्च धर्मगुरुंनी देखील यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. तसेच जनतेला देखील दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

जनतेला युद्धापासून दूर राहण्याचे आवाहन

यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना मोठा धक्का बसला आहे. इस्लामाबाद येथील लाल मशिदीचे मौलवी अजीज गाझी यांनी लोकांना युद्धापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे धार्मिक युद्ध नाही, त्यापासून दूर राहावे. मौलाना अजीज यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांमध्ये गणले जाते. इस्लामाबादच्या लाल मिशिदीचे ते मौलवी आहेत. ही सर्वात प्रसिद्ध मशीद आहे. दरम्यान मौलाना अब्दुल अजीज गाझी यांनी लोकांना विचारले की, तुम्ही भारतासोबत युद्ध लढणार आहात का? युद्ध लढणार नसाल तर तुम्ही शहाणे आहात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तणावपूर्ण परिस्थितीमध्ये पुतिन यांची मोदींना साथ; पहलगाम विरोधात घेतला आक्रमक पवित्रा

हे धार्मिक युद्ध नाही…

तसेच मौलाना अजीज यांनी असेही म्हटले की, ही भारत आणि पाकिस्तानमधील लढाई धार्मिक नाही. हे केवळ दोन देशांमधील युद्ध आहे. हे युद्ध केवळ सरकारनेच लढले पाहिजे. यामध्ये जनतेने सहभागी होऊ नये. धर्मासाठी आवश्यक असल्यास तुम्ही युद्धात सामील होऊ शकता. पण या युद्धाचा कोणालाही फायदा होणार नाही. यासाठी लढण्याची गरज नसून शहाणपणाने वागा असे मौलाना अजीज यांनी म्हटले.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक नेत्यांकडून धक्कादायक अशी विधाने समोर आली आहेत. तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पाकिस्तानला अल्लाहचा देश म्हणून संबोधले होते. त्यांनी म्हटले होते की, अल्ल्हाच्या इच्छेने जगात केवळ दोनच देश स्थापन झाले आहे, एक सौदी अरेबिया आणि दुसरा पाकिस्तान. मुनीर यांनी हिंदूविरोधतही वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

तसेच भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री, रेल्वे मंत्री यांनीही भारताला धमक्या दिल्या आहेत. पाकिस्तानकडून वांरवार अणुहल्ल्याची धमकी दते आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मोदी, अमित शाह अन् जयशंकर यांना तुरुंगात टाकून काढली धिंड…; खलिस्तानींचा नीच व्हिडिओ व्हायरल

Web Title: Pakistans top religious leader says india is better than us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

India Pakistan Conflict : भारताने UNSC पाकिस्तानची बोलती केली बंद; दहशतवादावर भर सभेत सर्जिकल स्ट्राईक
1

India Pakistan Conflict : भारताने UNSC पाकिस्तानची बोलती केली बंद; दहशतवादावर भर सभेत सर्जिकल स्ट्राईक

Middle East War : अमेरिकेची हल्ल्याची जंगी तयारी! महाकाय घातक जहाज हिंद समुद्रात दाखल; इराणही प्रत्युत्तर देण्यास सज्ज
2

Middle East War : अमेरिकेची हल्ल्याची जंगी तयारी! महाकाय घातक जहाज हिंद समुद्रात दाखल; इराणही प्रत्युत्तर देण्यास सज्ज

US-EU Tension : अमेरिकेशिवाय तुमची लायकी काय? भारत-ईयू Mother of Deals मुळे ट्रम्पचा जळफळाट ; युरोपला गंभीर इशारा
3

US-EU Tension : अमेरिकेशिवाय तुमची लायकी काय? भारत-ईयू Mother of Deals मुळे ट्रम्पचा जळफळाट ; युरोपला गंभीर इशारा

अमेरिकेत हिमवादळाचा कहर! भीषण थंडीत २५ जणांचा मृत्यू, वीजपुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती बिकट
4

अमेरिकेत हिमवादळाचा कहर! भीषण थंडीत २५ जणांचा मृत्यू, वीजपुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती बिकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.