मोदी, अमित शाह अन् जयशंकर यांना तुरुंगात टाकून काढली धिंड...; खलिस्तानींचा नीच व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा: कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांचा हिंदूविरोधी कारावाया थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. पुन्हा एकदा खलिस्तानी समर्थकांनी हिंदूविरोधी निदर्शने सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाच्या टोरोंटो येथे खलिस्तानी समर्थकांनी मोठया आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये कॅनडातून हिंदूना हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान या आंदोलनाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या निदर्शनादरम्यान खलिस्तानी समर्थकांनी संतापजक कृत्य देखील केले. यामध्ये एका मोठ्या ट्रकमध्ये एक पिंजरा ठेवण्यात आला होता. या पिंजऱ्या भारतीय नेत्यांचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे पुतळे ठेवण्यात आले होते. हे निदर्शन रविवारी (04 मे) कॅनडाच्या टोरोंटोच्या माल्टन गुरुद्वारांमध्ये काढण्यात आले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओ खलिस्तानी समर्थक हिंदूविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
Khalistanis funded by Pakistan & China organized anti-Hindu parade in Malton Gurdwara, Canada with effigies of PM Modi, EAM Jaishankar & Amit Shah.
Canada is the Western version of Pakistan with filthy Khalistanis!! pic.twitter.com/gL1q3ksZNh
— BALA (@erbmjha) May 5, 2025
दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर एका हिंदू समुदायाच्या नेत्याने पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्यांनी दहशतवादी गटाच्या उघड हिंदूविरोधी द्वेषावर तीव्र टिका केली आहे. तसेच शॉन बिडा यांनी देखील यापूर्वी एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, हा भारत सरकारचा निषेध नाही. तर कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी गटाकडून हिंदूविरोधी द्वेष आहे.
दरम्यान कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्की कार्नी यांना एका पत्रकाराने हिंदूविरोधी परेड आणि खलिस्तानी गटांविरुद्ध कारवाई संबंधी प्रश्न उपस्थित केला आहे. पत्रकाराने विचारले की, मार्क कार्नी यांच्या काळातील कॅनडा जस्टिन ट्रुडोंच्या कॅनडापेक्षा वेगळा असेल का? परंतु अद्याप यावर मार्क कार्नी यांनी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
जस्टिन ट्रुडो यांच्या काळात भारताचे कॅनडाशी असलेले संबंध अधिक बिघडले होते. जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप केले होते. परंतु हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. तथापि आता कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या कार्यकाळात भारतासोबतचे संबंध सुधारतील का हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.