Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Peru Earthquake : पेरुत भूकंपाचा जोरदार तडाखा! अँडीज पर्वतरांगेत हादरली जमीन; ५ जणांचा मृत्यू

Peru Earthquake Update : पेरुच्या अँडीज पर्वतरांगेत शनिवारी (१९ जुलै) मोठा भकंप झाला. या भूकंपात पाच जणांचा बळी गेला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे इमारती आणि घरे जमिनदोस्त झाली असून शेकडो लोक बेघर झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 20, 2026 | 10:01 AM
Peru Earthquake

Peru Earthquake

Follow Us
Follow Us:
  • पेरुत भूकंपाचा जोरदार तडाखा
  • अँडीज पर्वतरांगेत ५.५ तीव्रतेच्या धक्क्यांनी हादरली जमीन
  • शेकडो नागरिक बेघर
Peru Earthquake News in Marathi : लिमा : दक्षिण अमेरिकी शहर पेरुवर मोठे संकट कोसळले आहे. पेरुतील अँडीज पर्वतीय भागात शनिवारी (१९ जुलै) रात्री भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या भूकंपात ५ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी आहेत. या दुर्घटनेमुळे शेकडो नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.

Middle East Conflict : अमेरिका-इराण तणाव वाढला! भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना

अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, शनिवारी (१९ जुलै) स्थानिक वेळेनुसार ९.२४ वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू हुआनकायो प्रदेशातील सिकाय शहराच्या पासून २ किलोमीटर अंतरावर होता. याची खोली जमिनीपासून अवघ्या १० किलोमीटर खोलीवर असल्याने जोरदार झटके जाणवले.

अनेक इमारती-घरे जमिनदोस्त

या धक्क्यांची तीव्रता इतकी होती की अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. सिकाय आणि आसपासच्या परिसरातील अनेक घरे ढासळली आहेत. स्थानिक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे ३०० हून अधिक लोक बेघर झाले आहे. अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

कोसळलेल्या इमारतींमध्ये चर्च आणि कॉन्व्हेंटचाही समावेश आहे. अँडीज परिसरातील अनेक घरे मातीच्या विटा आणि पारंपारिक बांधकाम पद्धतीने उभारण्यात आली आहेत. यामुळे ही घरे भूकंपाचे धक्के सहन करुन शकली नाहीत. जोरदार धक्क्यांमुळे इमारती कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

शेकडो लोक बेघर

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक भागांतील घरे कोसळ्याने लोकांना कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर यावे लागले आहे. अनेक कुटुंबे बेघर झाली असून तात्पुरत्या निवाऱ्याचा शोध घेत आहेत.

पेरुमध्ये सतत भूकंप का होतात?

पेरु हा प्रशांत महासागरातील रिंग ऑफ फायर या भूकंपप्रवण पट्ट्यावर स्थित आहे. या भागातील टेक्टोनिक प्लेट्सच्या सततच्या हलचालींमुळे भूकंपाचा धोका कायक असतो. यापूर्वी २००७ मध्ये पेरुच्या पिस्को प्रांतात ७.९ तीव्रतेचा मोठा भूकंप झाला होता. यामध्ये सुमारे ६०० लोक मृत्यूमुखी पडले होते.

युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु

स्थानिक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आपत्कालीन सेवा आणि बचाव पथके मदत आणि बचावकार्य करत आहे. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. बचाव अधिकारी बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. बाधित कुटुंबांना आपत्कालीन मदत पुरवली जात आहे.

🚨🇵🇪#BREAKING | NEWS ⚠️
6 People have been killed in Peru
after a 5.5⚡️Magnitude Earthquake struck central Peru yesterday. pic.twitter.com/bS1xq43iHN
— Todd Paron🇺🇸🇬🇷🎧👽 (@tparon) July 19, 2026

India Japan Bullet Train : भारतावर जपानच्या माजी मंत्र्यांचा गंभीर आरोप; बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन वाद

Web Title: Peru earthquake 5 5 magnitude quake hits andes mountains five dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Earthquake
  • World news

संबंधित बातम्या

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त
1

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी
2

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी
3

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
4

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.